You are currently viewing लतादीदींच्या प्रकृती सुधारणा; ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू

लतादीदींच्या प्रकृती सुधारणा; ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू

मुंबई :

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना करोनाची लागण झाल्याने सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना करोनाची सौम्य लक्षणं जाणवत आहेत. सध्या त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे. पण अद्याप त्या आयसीयूमध्येच असल्याचे त्यांनी सांगितले आहे. लता मंगेशकर याची प्रकृती कशी आहे, याबाबत त्यांची भाची रचना शहा यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

रचना शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, “लता मंगेशकर यांना शनिवारी ८ जानेवरीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना करोनाची सौम्य लक्षण जाणवत होती. सध्या त्या उपचारांना उत्तम प्रतिसाद देत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. यामुळे आम्ही आनंदी आहोत. चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनामुळे लता मंगेशकरांची प्रकृती सुधारत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा