*ज्येष्ठ लेखिका कवयित्री कला शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आता पुरे बहाणे*
आता पुरे बहाणे जिवंत राहण्याचे
या थोरल्या जगी नाही कुणी कुणाचे
कर्तव्य संपले की आनंदे निघून जावे
आठवणीत असताच आवरते घ्यावे
परावलंबीअस्तित्व येण्यापूर्वी संपावे
स्वावलंबी आयुष्यअंतापर्यर्यंत जगावे
उपकाराचे ओझे नको शिरी जाताना
नाहीतरी मी काय आणले होतेयेताना
असंख्य जीव जन्मती हर दिनी जगी
आपणच थोडे एकटे,जागा अडवुनी
निष्क्रिय होऊनी उगा वावरत रहावे
कार्यभाग संपता,चंबुगबाळे आवरावे
हसावया नको कोणी मागे, रुसावया
नको कोणासभागपाडू,आल्यापावली
परत फिरावे,हेच शहाणपणाचेकौतुक
उरे मागे, सर्वांच्या स्मृतीत उरे सावली
आनंदक्षण तू जीवनी उपभोगलेले घे
संगती तुझ्या, नातीगोती,सारीमाणसे
आठवात तुझ्या तू उरी बांधुनी घे रे
कधीकाळी कोणा गरजेस धावून ये रे
संपेल आता हा प्रवास कोणत्या क्षणी
अवचित येई काळभेटीस याजीवाच्या
कर्तव्य चोख त्याचे नित्यबजावूनजाई
मनुजन्माची संपुष्टात येई सारीपुण्याई
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
कलाशिक्षिका
