You are currently viewing कुडाळ येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडी संपन्न
Oplus_16908288

कुडाळ येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडी संपन्न

कुडाळ :

कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था संचलित बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षीही आषाढ एकादशी निमित्त श्री विठ्ठल भक्तीची ” स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी पायी वारी” अत्यंत उत्साही व भक्तिपूर्ण वातावरणात आज कुडाळमध्ये संपन्न झाली.

बॅ.नाथ पै सेंट्रल स्कूलच्या इ. पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, मुक्ताबाई जनाबाई इ. संतांच्या वेषभूषा साकारल्या होत्या. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, गळ्यात टाळ -मृदुंग, वीणा, डोक्यावर तुलसीपात्र आणि हरिनामाच्या गजराने अवघी कुडाळ नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.

बाबासाहेब आंबेडकर चौक, कुडाळ येथून सुरू झालेली सदरची वारकरी दिंडी

“विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवीला l

वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडीला” ll

असा हरीनामाचा गजर करीत आणि ‘स्वच्छता हीच सेवा विठ्ठल भक्तीचा खरा मेवा’ व ‘विठ्ठल नामाचा गजर करू स्वच्छ वारीचा संकल्प धरू’

असा स्वच्छतेचा संदेश देत गांधी चौक मार्गे बाजारपेठेतून मारुती मंदिर कुडाळ येथे विसावली.

तेथे मारुतीरायाचे दर्शन घेत विद्यार्थ्यानी भक्तिरसपूर्ण वातावरणात विठुरायाचे अभंग गात भजन- कीर्तन केले व महा नैवेद्य अर्पण केला.

कुडाळ बाजारपेठेतील मारुती मंदिर विश्वस्त, उत्सव कमिटीतर्फे वारीमध्ये सहभागी झालेल्या मुलांना खाऊ- प्रसाद देऊन त्यांचं कौतुक, गौरव करण्यात आला.

अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिपूर्ण वातावरणात निघालेल्या या पायी वारीमध्ये बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, सौ. अमृता गाळवणकर,प्रा. अरुण मर्गज, नाथ पै सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या सौ. चैताली बांदेकर, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

सरतेशेवटी सदरची वारी श्री देव ब्राह्मण मंदिर, MIDC येथे आल्यावर वारकरी भजन संपन्न झाले व

*जातो माघारी पंढरी नाथा तुझे दर्शन झाले आता*

या गाण्याने करीत वारीची सांगता झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा