You are currently viewing सिंधुरत्न टॅलेंट सर्च परिक्षेत वेंगुर्ले तालुक्यातील होडाववडे गावातील केंद्र शाळा क्रमांक 1 च्या विद्यार्थ्यांचे यश

सिंधुरत्न टॅलेंट सर्च परिक्षेत वेंगुर्ले तालुक्यातील होडाववडे गावातील केंद्र शाळा क्रमांक 1 च्या विद्यार्थ्यांचे यश

सिंधुरत्न टॅलेंट सर्च परिक्षेत वेंगुर्ले तालुक्यातील होडाववडे गावातील केंद्र शाळा क्रमांक 1 च्या विद्यार्थ्यांचे यश

वेंगुर्ले

सन 2023-24 मध्ये झालेल्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परिक्षेत वेंगुर्ला तालुक्यांतील होडावडे गावातील केंद्र शाळा क्रमांक 1 च्या विदयार्थी कू. गार्गी मुरलीधर सातार्डेकर व कु. साईश समीर सावंत यांनी गोल्ड मेडल पटकावले.तर कु. विहंग सुशील पांचाळ हा ब्राँझ मेडलचा मानकरी ठरला.
तसेच ब्रेन डेव्हलपमेंट स्पर्धा परीक्षेत कु. गार्गी सातार्डेकर व कु. साईश सावंत ब्राँझ मेडलचे मानकरी ठरले.
गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेतही शाळेने उल्लेखनीय यश मिळवले असून कु. गार्गी सातार्डेकर व कु. साईश सावंत हे संयुक्तरीत्या राज्यात 3 रे आलेत.तर पाहिलीतील कु. सोहम संदीप सातार्डेकर हा राज्यात 11 वा आला.
या मुलांना वर्गशिक्षक श्रीम. तन्वी बांदिवडेकर, श्रीम. अर्चना मक्राणे व मुख्याध्यापक श्रीम. प्रशांती दळवी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. शा.व्य.स.अध्यक्ष श्री.समीर सावंत. उपाध्यक्ष सौ.नंदिनी कामत सर्व सदस्य, सर्वपालक तसेच होडावडा केंद्रप्रमुख श्री.लवू चव्हाण सर यांनी सर्व मुलांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा