You are currently viewing पत्रकारांना प्रथम कोरोना प्रतिबंधात्म लस द्या…

पत्रकारांना प्रथम कोरोना प्रतिबंधात्म लस द्या…

सामाजिक कार्यकर्ते शंकर पार्सेकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पत्रकार फ्रंटलाईन वर्कस प्रमाणे सतत अहोरात्र काम करत असतात. या कोरोनाच्या महामारीने देशभर आणि महाराष्ट्रात अनेक पत्रकारांचा बळी घेतलाय. असे असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांचे अजूनही लसिकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पत्रकार जीव मुठीत धरून काम करत आहे. यासाठी त्यांच्या कामाची जाण ठेवून त्यांचे प्राधान्याने तालुकानिहाय कोरोना प्रतिबंधात्म लसिकरण करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शंकर पार्सेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. यावेळी अनेकजण फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करत आहेत. यात डॉक्टर, नर्स, पोलिस अशा अनेकांचा समावेश आहे. त्या सर्वांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. मात्र त्यांच्या प्रमाणेच पत्रकारही फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांचेही प्राधान्याने लसिकरण करण्यात यावे, अशी मागणी श्री पार्सेकर यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 5 =