You are currently viewing वायंगणी येथील हेल्प ग्रुप फाउंडेशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

वायंगणी येथील हेल्प ग्रुप फाउंडेशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ला :

 

हेल्प ग्रुप फाउंडेशन वायंगणीच्या वतीने ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र शाळा सुरंगपाणी वायंगणी येथे तालुकास्तरीय भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरास एकाच वेळी ८० रक्तदात्यांनी विक्रमी रक्तदान केले. यावर्षी ७५ वा प्रजासत्ताक दिन असल्याने हेल्प ग्रुप फाउंडेशन वायंगणी यांनी आगळावेळा उपक्रम राबवला. या शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वेंगुर्ला एसटी आगाराचे आगार प्रमुख राहुल कुंभार, माजी सरपंच शामसुंदर मुणंनकर, खानोली विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन प्रशांत खानोलकर, केंद्र शाळा सुरंगपाणी शाळेचे मुख्याध्यापिका श्यामल मांजरेकर उपस्थित होते. यावेळी दाभोली शाळा नं. २ शिक्षक प्रशांत चिपकर यांना राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शामल मांजरेकर यांचाही सत्कार करण्यात आला. या रक्तदानासाठी सावंतवाडी आरोग्य विभाग ब्लड बँक व एस एस पी एम हॉस्पिटल पडवे या ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले. तसेच उपकेंद्र आडेली यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. यावेळी ग्रुपचे उपाध्यक्ष हर्षद साळगावकर, प्रवीण राजापूरकर, महेंद्र सातार्डेकर, शेखर तोरस्कर, उल्हास कामत, नारायण पेडणेकर, प्रशांत पेडणेकर, सिद्धेश कोचरेकर, जाई नाईक, सिद्धी गावडे, प्रेरणा राजापूरकर, भिकाजी गावडे, प्रसाद पेडणेकर उपस्थित होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक ग्रुपचे अध्यक्ष सुमन कामत यांनी केले. तर सुत्रसंचालन सुनिल नाईक यानी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा