You are currently viewing डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळल्याने वैभववाडीत आरोग्य यंत्रणा अलर्ट

डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळल्याने वैभववाडीत आरोग्य यंत्रणा अलर्ट

जिल्हा आरोग्य पथकही दाखल : शहरातील विविध भागात दिली भेट

वैभववाडी

वैभववाडी तालुक्यात डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हा आरोग्य पथक वैभववाडीत दाखल झाले आहे. वैभववाडी शहरात आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणाची त्यांनी पाहणी केली. या पथकामध्ये जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश करतसकर आरोग्य अधिकारी श्री बुचडे, रमेश परब यांचा समावेश होता. पथकाने वैभववाडी शहरातील विविध भागांना भेट देत सर्वेक्षणाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना योग्य त्या सूचना दिल्या.

तालुका आरोग्य यंत्रणेकडून घर टू घर सर्वेक्षण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. रमेश करतसकर व टीमने शहरातील गोपाळनगर, तांबेवाडी इतर भागात करण्यात आलेल्या सर्वेक्षणाची पाहणी केली.
डास व आळी प्रतिबंधासाठी अबेटिंग करणे, धुर फवारणी करणे, तसेच कंटेनर सर्वेक्षणाच्या सूचना करतसकर यांनी दिल्या. आठवड्यातून एक दिवस भांडी स्वच्छ धुवून ती कोरडी ठेवावी. म्हणजेच आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळावा. पाणी साठ्याचा योग्य तो निचरा करावा अशाही सूचना करतसकर यांनी दिल्या. पावसाळ्यात प्रत्येकाने पाणी उकळून प्यायले पाहिजे. असेही सांगितले. पाहणी दौऱ्यावेळी उपनगराध्यक्ष संजय सावंत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार, तालुका आरोग्य सहाय्यक आनंदा चव्हाण, डॉ. महेंद्रकर, आरोग्य सेवक, सेविका उपस्थित होत्या.
तापासारखे आजार कोणीही अंगावर काढू नये, ताप व इतर कोणताही आजार वाटल्यास त्यांनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्री करतसकर यांनी केले आहे.

*संवाद मिडिया*

*🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊*🏃‍♀️🏃‍♂️

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*खास स्वातंत्र्यदिनानिमित्त तब्बल *💫50% सूट..!!💫*

*_🏢सावंतवाडीचे प्रसिद्ध*

*👗किया फॅशन👘*

*कपड्याचे दालन घेऊन आले आहेत प्रत्येक खरेदीवर तब्बल 💫५० टक्के पर्यतची सूट..!!💫*

*_👼👧🧒लहान मुलांसह महिलांना 👩‍⚖️ लागणारे फॅन्सी कपडे 👘 २०० पासून अगदी २ हजारापर्यंत🤗_*

*_रेडीमेड ड्रेस 👘, लेगिन्स👖, प्लाझो👖, कुर्ती👘, कॉटन पॅन्ट👖, नाईटी 👘आणि बरेच काही…!!🤗_*

*_त्याचबरोबर नवजात बालकांपासून👶🏻 पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांचे 👦🏻कपडे उपलब्ध…!!🤗_*

*🎴आमचा पत्ता:-*
*दत्तात्रय निवास-गांधी चौक, सावंतवाडी, शॉप नंबर १५, तारा हॉटेल समोर*

*◾प्रोप्रा:-*
*सौ. निकीता नंदादिप चोडणकर*

*📲संपर्क:-*
*9403920802*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106270/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा