You are currently viewing बुर्डीपुल येथे रिक्षा-आयशरची समोरासमोर धडक; दोन जखमी

बुर्डीपुल येथे रिक्षा-आयशरची समोरासमोर धडक; दोन जखमी

बुर्डीपुल येथे रिक्षा-आयशरची समोरासमोर धडक; दोन जखमी

सामाजिक कार्यकर्ते शुभम हिर्लेकर यांच्यासह सहकाऱ्यांनी जखमींना तत्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले

सावंतवाडी :

बुर्डीपुल येथे आज सकाळी दहाच्या सुमारास रिक्षा आणि आयशर टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात आंबोली येथील गणपत राऊळ (६५) आणि रिक्षाचालक सचिन्द्र भिसे (५५) हे दोघे जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते शुभम हिर्लेकर, सोहम हिर्लेकर आणि शिवम हिर्लेकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती देण्यात आली.
दरम्यान, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव आणि लक्ष्मण कदम हे संस्थेची रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. तसेच सामाजिक कार्यकर्ते व पंचायत समिती सदस्य मायकल डिसोझा यांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा