You are currently viewing सावंतवाडी नगरपरिषदेच्या बहुप्रतिक्षित ‘मेडिटेशन योगा सेंटर’चे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन
Oplus_16908288

सावंतवाडी नगरपरिषदेच्या बहुप्रतिक्षित ‘मेडिटेशन योगा सेंटर’चे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन

नवीन कचरा संकलन वाहने व अत्याधुनिक मशिनरींचे लोकार्पण; सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण

सावंतवाडी | प्रतिनिधी :

सावंतवाडी नगर परिषदेच्या वतीने शहरात विविध विकासकामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी सावंतवाडी नगर परिषदेच्या नरेंद्र डोंगर येथील जागेमध्ये उभारण्यात येणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘मेडिटेशन योगा सेंटर’चे भूमिपूजन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यासोबतच सावंतवाडी शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या नवीन कचरा संकलन वाहनांचा तसेच अत्याधुनिक मशिनरींचा लोकार्पण सोहळाही यावेळी पार पडला.

या कार्यक्रमास आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, युवराज लखमराजे भोसले, मुख्याधिकारी विनायक औंधकर, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, सभापती आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, दीपाली भालेकर, मोहिनी मडगांवकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, माजी नगरसेवक उदय नाईक, जिल्हा बँक संचालक रवि मडगांवकर, नगरसेविका नीलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुनिता पेडणेकर, सुकन्या टोपले, दिलीप भालेकर, अभियंता तुषार सरडे, ठेकेदार मेहर पडते आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. नगरपरिषदेच्या विकासकामांना गती देण्याबरोबरच शहरातील स्वच्छता व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

प्रतिक्रिया व्यक्त करा