You are currently viewing पथदिवे, हायमास्ट सुरू न झाल्यास आंदोलन छेडणार

पथदिवे, हायमास्ट सुरू न झाल्यास आंदोलन छेडणार

ठाकरे गट शिवसेनेचा इशारा ; पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर…

मालवण

येथील पालिका हद्दीतील मार्गावरील अनेक पथदिवे बंद स्थितीत आहेत. मुख्य चौक, नाका मार्गावर बसवण्यात आलेले हायमास्ट टॉवरही बंद असून १५ दिवसात या लाईट सुरु न केल्यास नागरिकांसमवेत पालिका कार्यालया समोर आंदोलन छेडण्याचा इशारा शहर शिवसेना ठाकरे गट यांच्यावतीने पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे.

पावसाळा कालावधी असल्याने साचणारे पाणी, रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी, खड्डेमय मार्ग यांचा विचार करता पादचारी व सायकल चालक यांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच आगामी काळातील सण उत्सव यांचा विचार करता बंद पथदिवे, हायमास्ट टॉवर लवकरात लवकर सुरू करणे आवश्यक आहे असे या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहर प्रमुख सन्मेष परब, उपशहर प्रमुख यशवंत गावकर, तपस्वी मयेकर, युवासेना पदाधिकारी सिद्धेश मांजरेकर, उमेश चव्हाण, सिद्धार्थ जाधव, युवतीसेना तालुका प्रमुख निनाक्षी शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा