You are currently viewing २८ जुलैला जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडत

२८ जुलैला जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडत

सिंधुदुर्ग :

 

जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या निवडणुकांची तारीख अंतिम टप्प्यात येऊन ओबीसी आरक्षणामुळे रद्द झाले होते. आरक्षणाची सोडत गुरुवार दि. २८ जुलै रोजी होणार आहे. यापूर्वी बुधवार दि. २३ जुलै ला होणाऱ्या आरक्षण सोडतीला राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण रद्द केले होते. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या ५५ गट आणि ११० गणांची रचना होऊन ओबीसी वगळता इतर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चित झाला होता. मात्र, आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमी गेल्या आठवड्यात १३ जुलै रोजी होणारी आरक्षण सोडत रद्द करण्यात आली होती. मात्र २० जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण देण्याचा निर्णय दिला. त्यामुळे आता होणाऱ्या निवडणुका आरक्षणानुसार होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार जिल्हाधिकारी मंगळवार दि. २६ जुलै रोजी आरक्षण सोडतीची अधिसूचना जाहीर करतील व त्यानंतर गुरुवारी २८ जुलैला प्रत्यक्ष आरक्षणाची सोडत होणार आहे.

जिल्हा परिषद गटासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर आरक्षणाची सोडत होईल तर पंचायत समिती गणांसाठी तहसीलदार पातळीवर आरक्षण सोडत होणार आहे. ५ ऑगस्ट रोजी अंतिम आरक्षण जाहीर होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × four =