You are currently viewing “गोवंश रक्षण अभियाना”तून गोसेवेत योगदान द्यावे

“गोवंश रक्षण अभियाना”तून गोसेवेत योगदान द्यावे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढत्या गोवंश हत्येला पायबंद घालण्याची गरज होती आणि त्याची सुरुवात कुडाळमधून झाली आहे. पकडलेला कंटेनर आज कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये सडत पडला आहे. सोडवलेली जनावरे सरसोली धाम गोशाळेत आहेत. शासकीय पद्धतीने त्यांची निगराणी राखणे अशक्य आहे कारण गुरांच्या सोडवणूकीचा विचार यापूर्वी गंभीरपणे आणि प्रामाणिकपणे झालेला नव्हता, हे सरळच दिसते आहे. यापुढेही पकडलेल्या जनावरांच्या निगराणीचा प्रश्न आणखी जटील होईल, कारण कत्तलीसाठीच्या वाहतुकीचा तिढा आणि किडा अजूनही मरत नाही. साहजिकच, लढाई अजून संपलेली नाही.

पकडलेल्या आणि भटक्या गोवंशाची देखभाल करणे, चारा पाणी औषधाची व्यवस्था करणे, गावातल्या शेतकऱ्यांना गोधन वाढवण्यासाठी मदत करणे, शेण गोमूत्र यावर प्रक्रिया करून विविध १६ प्रकारच्या उत्पादनातून चळवळ आर्थिकदृष्ट्या स्थिर करणे आदी गोष्टींवर काम चालू आहे. कमळ प्रतिष्ठान यामधूनच गोसेवा आणि ग्राम अर्थसमृद्धी यांचे नाते दृढ करण्याचे काम यातून करू इच्छित आहे.

गोवंश रक्षण अभियानात आपण पुढील सगळ्या कामापैकी कशात आपला सहयोग देऊ इच्छिता, याबद्दल नक्की कळवावे.

१) गोशाळा व अन्य व्यवस्था निर्मिती आणि देखभाल

२) कायदेशीर मदत विभाग

३) फ्रंटलाईन गोसेवक (बेकायदेशीर कृत्यांना आळा घालणे/जनावरांची व्यवस्था लावणे यासाठीचा फोर्स)

४) सोशल मीडिया यंत्रणा (प्रिंटमीडिया/न्यूजचॅनेल्स/यु ट्यूब/सोशल मीडिया याद्वारे बाजू मांडणे व प्रचार प्रसार करणे)

५) समर्थक गट/हितचिंतक म्हणून काम करणे व होईल त्या पद्धतीने सर्वतोपरी (आर्थिकसह अन्य) मदत करणे

६) आर्थिक यंत्रणा सांभाळणे.

७) दूध/शेण/गोमूत्र यावर संशोधन/विकास व विक्री-वितरण यंत्रणा.

अशा सात गटात *गोवंश रक्षण अभियान* काम करत आहे.

यात आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया अपेक्षित. यानंतरच इच्छुकांना त्या त्या गटात विभागून इतर ग्रुप बंद करण्यात येतील. सुसूत्र कामासाठी ही रचना गरजेची वाटते.

*आपल्या प्रतिक्रिया 9422957575 वर अपेक्षीत. गैरसमज नसावा. परिस्थितीची गरज समजून घ्या.*

या अभियानासाठी आर्थिक मदतीची गरज फार मोठ्या प्रमाणावर आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी

*गोवंश रक्षण अभियान*
*युनियन बँक ऑफ इंडिया*
*शाखा -ओरोस सिंधुदुर्गनगरी*
*चालू खाते क्रमांक – 686401010050219*
*IFSC CODE UBIN0568643*
*G-pay/Phone pay No. : 9527958889*

या क्रमांकावर आपली मदत पाठवावी आणि त्याचा स्क्रीन शॉट वा रिसीट 9422957575/ 9420207055/ 9421036588 यापैकी किमान कोणत्याही एका क्रमांकावर पाठवावा. धन्यवाद!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + nineteen =