You are currently viewing रसाळी
Oplus_16908288

रसाळी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम लेख*

 

*रसाळी…..*

 

कोणीतरी विचारलं….रसाळी म्हणजे काय?आणि मन त्याकाळात रमलं….

आमरसाचं जेवण घरी किंवा पाहुण्यांना अगत्यानेज्ञदेतात त्याला म्हणतात रसाळी….!

माचातले पक्व झालेले आंबे मोठ्या टोपल्यात काढून आणणं..विहिरीच्या ताज्या पाण्याने स्छ धुवून कोरडे करून

हाताने माचवून,चोळून आतील कोय सैल झाली की पातेल्यात आमरस करायचा.‌‌.

.खास आमरस,दूध,चारोळी साजूक तूप..घडीच्या मऊसूत पोळ्या,सपीट,,,गहू ओलवून दळलेले बारीक पीठाचे वाफेवरील कानोले..त्या पोळीचे गरम असतानच पूड उकलून तूप लावून गरमगरमच ताटात वाढायची…विदर्भ स्पेशल चनाडाळीचा भरडा,कांदा भरपूर घातलेली सुकी पाटोडी,भजी,कुरड्या पापड,सांडगे..‌ताक किंवा पन्हं.‌भरडाभातावर कढवलेलं तेल व त्यात सुक्या लाल मिरच्या हव्यातच.

सोबत कैरीचं ताजं लोणचं‌…कोणी ताज्या उकडलेल्या शेवया,सरगुंडे किंवा गरम भातासोबतही आमरस आवडीने खातात….

पंचवीस तीस जणांची नातेवाईक,पाहुण्यांसोबत बसलेली पंगत ‌.रांगोळी,उदबत्तीचा घमघमाट या रसाळीला शोभा आणत.लेकजाव ई,व्याही पाहुणे मंडळींना रसाळीला बोलावून जेवण आहेर देऊन सन्मान करण्याची रीतच असायची. कारण विदर्भातील आमच्या खेडेगावी आजोळी गावराणी आंब्यांची आमराई असे.प्रत्येक झाडाला वेगळं नाव.वेगळं वाण‌‌.वेगळ्या चवीचा आंबा..केळीआंबा,लाडू आंबा,आकारावरून…घोटी आंबा अगदी छोटासा‌‌..बैलगाड्या भरभरून हे आंबे पाडाला आले की उतरवून दोन गोदामात त्याचा माच ,अढी लावली जायची‌.सुकली पाने त्यावर घातली जायची.मग रोज त्यात पक्व फळ शोधून टोपले भरभरून खायला,रसाला,वड्या,आंबा पोळीसाठी वापरायचे.मुलांना आंबे खायला बसण्यासाठी आजोबांनी ओटाच बांधून घेतला होता अंगणात.

गावात सगळीकडे आपापल्याआंब्याचे नमुने पाठवले जात.बायका आंब्याची सोळवण,ओटी भरत.एकंदरीत आंबा

किलोत बघेपर्यंत खूपच आनंदीआनंद

अनुभवला.

इतकी वर्ष माहेर सोडून झाले तरी तो आम्रगंध आठवणीत दरवळतो.👍✍️😊

इतकी वर्ष झाली तरी तो आम्रगंध आठवणीत अजूनही दरवळतो…!

 

अरुणा दुद्दलवार दिग्रस यवतमाळ

प्रतिक्रिया व्यक्त करा