रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलकडून २० विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप
डिस्ट्रिक्ट ग्रँटच्या माध्यमातून शिक्षणासाठी प्रवास सुलभ; मान्यवरांच्या उपस्थितीत उपक्रम संपन्न
सिंधुदुर्ग
रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलच्या वतीने तसेच IPDG रो. अरुण भंडारे यांनी उपलब्ध करून दिलेल्या डिस्ट्रिक्ट ग्रँटच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी आणि शाळेत ये-जा करण्यासाठी प्रवास सुलभ व्हावा या उद्देशाने २० विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलचे अध्यक्ष रो. दीपक आळवे, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो. प्रणय तेली, चार्टर प्रेसिडेंट डॉ. प्रशांत कोलते, रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष रो. मकरंद नाईक, सेक्रेटरी रो. म्हाडदळकर, आयपीपी रो. राजीव पवार, रो. ललित वंजारे, रो. व्यंकटेश घोगळे, रो. गौरव घोगळे, रो. विवेक राणे, आयपीपी रो. अरुण मालणकर, ओसरगावचे उपसरपंच गुरुदास सावंत, ग्रामपंचायत सदस्या वंदना पारकर, सामाजिक कार्यकर्ते बबली राणे, ग्रामस्थ तसेच लाभार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींना शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत, अशा उपक्रमांमुळे मुलींच्या शिक्षणाला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
