You are currently viewing जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांचा मालवण भाजप कडून सत्कार

जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांचा मालवण भाजप कडून सत्कार

मालवण

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी तर उपाध्यक्ष पदी अतुल काळसेकर यांची निवड झाली आहे. त्यानिमित्ताने भाजपच्या मालवण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार केला.

आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदी मनीष दळवी आणि उपाध्यक्ष पदासाठी अतुल काळसेकर यांची निवड झाल्यानंतर मालवण भाजपने त्यांचे अभिनंदन केले. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, व्यापार- उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर, महेश मांजरेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, मोहन वराडकर यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा