You are currently viewing २४ नोव्हेंबरला आरवली येथील “श्री देव वेतोबा”चा जत्रोत्सव 

२४ नोव्हेंबरला आरवली येथील “श्री देव वेतोबा”चा जत्रोत्सव 

वेंगुर्ले :

 

वेंगुर्ले तालुक्यातील आरवली येथील प्रसिद्ध “श्री वेतोबा” देवाचा वार्षिक जत्रोत्सव मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा शके १९४४ गुरुवार २४ नोव्हेंबरला विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. दरवर्षी प्रमाणे पाद्य पूजा, दर्शन, नवस फेड व रात्री श्रींची पालखी प्रदक्षिणा, फटाक्यांची आतषबाजी, दशावतारी नाटक आणि महाप्रसाद अशा भरगच्च कार्यक्रमाने हा उत्सव संपन्न होणार आहे.

तर दुसऱ्या दिवशी २५ नोव्हेंबरला श्री देवी सातेरीचा जत्रोत्सव संपन्न होणार आहे. या दिवशी श्री देव वेतोबाकडे नवसाचे तुलाभार व गुणीजन गौरव कार्यक्रम होणार आहे. तरी सर्वांनी श्रीच्या उत्सवात उपस्थित राहून श्री देव वेतोबाचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन श्री देव वेतोबा संस्थान आरवली यांच्या वतीने केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा