You are currently viewing राणे समर्थकांच्या मारहाणीत जखमी झालेले बाळा राऊत यांची खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी केली विचारपूस

राणे समर्थकांच्या मारहाणीत जखमी झालेले बाळा राऊत यांची खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी केली विचारपूस

*राणे समर्थकांच्या मारहाणीत जखमी झालेले बाळा राऊत यांची खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी केली विचारपूस*

*ओरोस शासकीय मेडिकल कॉलेज मध्ये दिली भेट ; मारहाणीचा केला निषेध*

लोकसभा निवडणुकीसाठी काल मंगळवारी मतदान संपल्यावर सायं. ६.२० सुमारास कणकवली खारेपाटण विभागातील शेर्पे या गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी सरपंच बाळा राऊत यांना राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. यात ते जखमी झाल्याने त्यांना तातडीने खारेपाटण प्रा. आ. केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र जखम गंभीर असल्याने त्यांना ओरोस येथील शासकीय मेडिकल कॉलेज मध्ये दाखल करण्यात आले आहे. आज खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी बाळा राऊत यांची भेट घेऊन विचारपूस करून त्यांना धीर दिला. तसेच बाळा राऊत यांना झालेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त केला. राणे समर्थकांची हीच दहशत संपविण्यासाठी शिवसेना लढा देत आहे.त्यासाठी जनतेची साथ महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,हरकूळ सरपंच बंडू ठाकूर,सचिन आचरेकर आदी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा