You are currently viewing शिक्षक भारती कणकवली संघटनेच्यावतीने कणकवली  तालुका मर्यादित गुणवंत विद्यार्थी व गुणवंत शिक्षक यांचा केला गौरव

शिक्षक भारती कणकवली संघटनेच्यावतीने कणकवली  तालुका मर्यादित गुणवंत विद्यार्थी व गुणवंत शिक्षक यांचा केला गौरव

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा कणकवली आयोजित 2022 विद्यार्थी गुणगौरव समारंभ व गुणवंत शिक्षक समारंभ नुकताच मारुती विद्यामंदिर केंद्रशाळा जाणवली या ठिकाणी दशरथ शिंगारे तालुका अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा कणकवली यांच्या अध्यक्षतेखाली दिमाखदारपणे संपन्न झाला .याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित किसन दुखंडे -राज्य संघटक शिक्षक भारती ,संतोष पाताडे – जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग, आशा गुणीजन -महिला जिल्हाध्यक्ष ,प्रसाद मसुरकर – अध्यक्ष माध्यमिक शिक्षक भारती कणकवली , विजय भोगले – अध्यक्ष पदवीधर शिक्षक संघटना सिंधुदुर्ग ,केंद्रप्रमुख – के . एम .पवार ,राजेंद्रप्रसाद मणेरीकर, सद्गुरु कुबल ,विलास पांचाळ -अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती केंद्रशाळा शेर्पे , रामचंद्र सातवसे जिल्हा प्रतिनिधी शिक्षक भारती व शिक्षक संघटना पदाधिकारी -संदिप कदम -अध्यक्ष कास्ट्राईब संघटना , हरकुळकर मॅडम -बहुजन शिक्षक संघटना ,विजय पाताडे – शिक्षक समिती ,आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते . .सन 20 21 मध्ये कणकवली तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षा शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थी इयत्ता पाचवी – 28 ,इयत्ता आठवी – 29 विद्यार्थी ,तर नवोदय विद्यालयात निवड झालेल्या 15 अशा एकूण 72 विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र ,भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन करण्यात आला .

तसेच कणकवली तालुक्यातील विजय मोहन पाताडे (पदवीधर शिक्षक ) -जिल्हा परिषद शाळा वाघेरी नंबर १, प्रियंका विजय भोगले (पदवीधर शिक्षक ) नांदगाव मधलीवाडी ,संदीप हरी कदम – (पदवीधर शिक्षक ) -तिवरे खालची ,अतुल भोगे (उपशिक्षक ) -मारुती विद्यामंदिर केंद्रशाळा जाणवली आणि व पीएचडी साठी निवड झालेले कणकवली तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक अमोल विलास भंडारी (उपशिक्षक ) – केंद्रशाळा शेर्पे यांचा कणकवली तालुक्यातील गुणवंत शिक्षक – 2022 म्हणून संघटनेच्यावतीने सन्मानपत्र , शाल ,श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .तसेच तालुका शाखेच्यावतीने दशरथ शिंगारे – महाराष्ट्र राज्य शासन आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक यांची राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त या संघटनेच्या राज्य कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल व सिंधुदुर्गला एक सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचा गौरव जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी केला .श्रीराम विभुते , आशा गुनिजन , मंगेश खांबळकर यांचा विविध संस्थांचे राष्ट्रीय पुरस्कार सन 2021 -22 मध्ये प्राप्त झालेले त्यां बद्दल त्याचा सुद्धा सत्कार संघटनेच्यावतीने करण्यात आल्या .तर नव्यानेच शिक्षक भारती शाखा कणकवली मध्ये प्रवेश केलेले गुरुप्रसाद पाटील यांची तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती करून त्यांचा सन्मान करण्यात आला .संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकारी म्हणून निवड झालेले मदनकुमार नारागुडे ,रूपाली चव्हाण, यांचाही सत्कार करण्यात आला .अनुजा रावराणे सेवानिवृत्त शिक्षिका व संघटनेच्या पाईक यांनी सेवानिवृत्तीनंतरही संघटना उपक्रमात हिरिरीने भाग घेऊन सर्वांचीच वाहवा मिळवली एक नवा आदर्श निर्माण केला त्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले . शिक्षक भारती प्राथमिक कणकवली तालुका उत्कृष्ट कार्यकर्ता -2022 साठी संजय रावण कोळी -मुख्य संघटक व मंगेश राजाराम खांबाळकर – कार्याध्यक्ष यांना सन्मानपत्र , शाल ,श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले .कणकवली तालुका शाखेच्या वतीने नवोदय विद्यालय मोफत सराव परीक्षा व गुणवंत विद्यार्थी व गुणवंत शिक्षक यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करून एक चांगला व स्तुत्य उपक्रम राबविला आहे . शिक्षक भारती कणकवली संघटना पदाधिकाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे अशा प्रकारचे गौरवोद्गार जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी काढले आणि निश्चितच कणकवली तालुका शिक्षक भारतीची घौड – दौड निश्चितच उंचावत राहिल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला .किसन दुखंडे राज्य संघटक यांनी सुद्धा संघटनेच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले व शुभेच्छा दिल्या .याप्रसंगी संघटनेच्या उपक्रमांला विजय भोगले -अध्यक्ष पदवीधर शिक्षक संघटना सिंधुदुर्ग ,केंद्रप्रमुख – राजेंद्रप्रसाद मणेरीकर ,सद्गुरु कुबल , के . एम पवार ,प्रसाद मसुरकर -अध्यक्ष माध्यमिक शिक्षक भारती शाखा कणकवली यांनी शाखा कणकवली प्राथमिक शिक्षक भारतीचे विशेष अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या . कणकवली तालुक्यातील वेगवेगळ्या संघटनातील गुणवंत शिक्षकांना प्रथमच एकाच व्यासपीठावर आणून त्यांना संघटनेच्यावतीने सन्मानित केले हे निश्‍चितच दिशादर्शक ठरेल असे सर्वच मान्यवरांनी गौरवोद्गार काढले व संघटनेच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या . गुणवंत शिक्षकांच्या वतीने विजय पाताडे ,संदीप कदम ,प्रियंका भोगले ,अमोल भंडारी ,अतुल भोगे यांनी आपली दिलखुलासपणे मनोगते व्यक्त केली व संघटनेला गुणवंत शिक्षक म्हणून निवड केल्याबद्दल धन्यवाद दिले . संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष दशरथ शिगारे यांनी केले तर सन २० २१ – २ o२ २या सालात संघटनेने राबविलेल्या विविध उपक्रमांचे अहवाल वाचन तालुका सचिव श्रीराम विभूते यांनी केले .या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक भारती कणकवली तालुका पदाधिकारी दशरथ शिंगारे , श्रीराम विभुते, मंगेश खांबलकर , गुरुप्रसाद पाटील ,कल्पना सावंत, दीपिका चव्हाण, शशिकांत तांबे ,संजय कोळी ,मदनकुमार नारागुडे, रुपाली जाधव ,अनुजा रावराणे, प्रशांत पाटील , सोनाली सावंतआदी पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली .संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका सचिव श्रीराम विभूते यांनी केले तर आभार तालुका कार्याध्यक्ष मंगेश खांबळकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा