You are currently viewing सिंधुदुर्गात ६६.१२ टक्के मतदान…

सिंधुदुर्गात ६६.१२ टक्के मतदान…

सिंधुदुर्गात ६६.१२ टक्के मतदान…

गत निवडणुकीपेक्षा साडे तीन टक्क्यांनी मतदानात वाढ…

ओरोस

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या ७ मे ला झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यात ६६.१२ टक्के मतदान झाले आहे. ६ लाख ६४ हजार ५६६ पैकी ४ लाख ३९ हजार ४१९ मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावला आहे. यात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांत निरुत्साह दिसून आला. सर्वाधिक मतदान सावंतवाडी विधानसभा क्षेत्रात ६६.४९ टक्के एवढे झाले आहे. दरम्यान, २०१९ च्या लोकसभेपेक्षा सुमारे साडे तीन टक्क्यांनी मतदान वाढले आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात तिसऱ्या टप्प्यात ७ मे ला मतदान प्रक्रिया पार पडली. या लोकसभेसाठी महायुतीच्या वतीने भाजपचे केंद्रीयमंत्री नारायण राणे, इंडिया आघडीच्यावतीने ठाकरे सेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यासह अन्य सात उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यातील नारायण राणें विरुद्ध विनायक राऊत अशी थेट लढत दिसून आली. विशेष म्हणजे हे दोन्ही तुल्यबळ उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होते. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघा पेक्षा जास्त उत्साह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांत दिसून येत होता. त्यामुळेच जिल्ह्याचा टक्का वाढला आहे.

कणकवली विधानसभा मतदार संघात दोन लाख २७ हजार ७३५ मतदार निश्चित झाले होते. त्यातील एक लाख ५० हजार ३२० मतदारांनी ६६.०१ टक्के एवढे मतदान केले आहे. कुडाळ विधानसभा मतदार संघात दोन लाख १२ हजार ३६० मतदार निश्चित झाले होते. त्यातील एक लाख ३९ हजार ८५६ एवढे ६५.८६ टक्के मतदान झाले आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघात दोन लाख २४ हजार ४७१ एवढे मतदार निश्चित झाले होते. यातील एक लाख ४९ हजार २४३ मतदारांनी ६६.४९ टक्के एवढे मतदान केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा