You are currently viewing कलंबिस्त (मळा) येथे १९ फेब्रुवारी रोजी शिवस्वराज्य मित्रमंडळातर्फे शिवजयंती उत्सव

कलंबिस्त (मळा) येथे १९ फेब्रुवारी रोजी शिवस्वराज्य मित्रमंडळातर्फे शिवजयंती उत्सव

सावंतवाडी :

 

१९ फेब्रुवारी रोजी शिवस्वराज्य मित्रमंडळ कलंबिस्त (मळा) बाजारपेठ आयोजीत शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाचे औचीत्य साधुन कोल्हापुर येथील “अमरक्रांती कला पथक यांचा पोवाडा” सादर करण्यात येणार आहे.

१९ फेब्रुवारी रोजी होणारा शिवजयंती उत्सव हा शिवमय व्हावा या उद्देशाने सकाळी ९ वाजता महाराजांच्या मुर्तिचे पुजन, सकाळी ९.३० वाजता दर्शन व तिर्थप्रसाद, स. १० वाजता “अमरक्रांती कलापथक कोल्हापुर यांचे (पोवाडा)” सादरीकरण, दुपारी १२.३० वा.महाराजांची आरती, दु.१ वा.महाप्रसाद,दु. ३ वाजता हभप संदेश गोसावी यांची किर्तन सेवा “पावन खिंडीचा रणसंग्राम ” सांय ५ वा. भजन सेवा शिवस्वराज्य मित्रमंडळ ,सांय. ६ वाजता उत्तर पुजा व समारोप आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी भावीकांनी व शिवभक्तांनी तिर्थ प्रसादाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवस्वराज्य मित्रमंडळ कलंबिस्त (मळा) बाजारपेठ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − fourteen =