You are currently viewing तारकर्लीत व्हेल माशाच्या ५ कोटी ७ लाखाच्या उलटीसह दोघांवर कारवाई…

तारकर्लीत व्हेल माशाच्या ५ कोटी ७ लाखाच्या उलटीसह दोघांवर कारवाई…

तारकर्लीत व्हेल माशाच्या ५ कोटी ७ लाखाच्या उलटीसह दोघांवर कारवाई…

स्थानिक गुन्हे शाखेची मतदानादिवशी धडक कारवाई
घराच्या शेजारी ठेवलेली ५ किलो ७० ग्रॅम उलटी घेतली ताब्यात..

ओरोस

स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे पथकाने ७ मे रोजी मालवण तालुक्यातील तारकर्ली वरचीवाडी येथे सापळा रचुन घराचे बाजूला लपवून ठेवलेली ५ किलो ७० ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी सदृश्य पदार्थ जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराचे दराप्रमाणे मिळालेल्या व्हेल माशाच्या उलटीची किंमत ५ कोटी ७ लाख रुपये एवढी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
७ मे २०२४ रोजी मालवण तालुक्यातील तारकर्ली वरचीवाडी या ठिकाणी व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रीस) विक्री करण्यासाठी आणून ठेवली असल्याची माहीती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली. प्राप्त माहीतीची खातरजमा करून कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिलेले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे पथकाने तारकर्ली, वरचीवाडी येथे सापळा रचुन एका संशयित इसमाला ताब्यात घेवुन त्याने राहते घराचे बाजूला लपवून ठेवलेली ५ किलो ७० ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी सदृश्य पदार्थ जप्त करण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजाराचे दराप्रमाणे मिळालेल्या व्हेल माशाच्या उलटीची किंमत ५ कोटी ७ लाख रुपये एवढी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारात आणखीन एका आरोपीचा सहभाग निष्पन्न झाल्याने दोन्ही आरोपींविरुध्द मालवण पोलीस ठाण्यात भारतीय वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४२, ४३, ४४, ४८, ५१ नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा पुढील तपास मालवण पोलीस ठाण्याकडून सुरु आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, पोलीस हेड कॉन्स्टेबल आशिष गंगावणे, प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे यांनी केलेली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा