You are currently viewing मागील वर्षीच्या पुरहानीची नुकसान भरपाई महसूल कडे जमा…..

मागील वर्षीच्या पुरहानीची नुकसान भरपाई महसूल कडे जमा…..

नुकसान भरपाईचे दिवाळी पूर्वी वाटप करा : बाबुराव धुरी

दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यामधली गेल्यावर्षी पुरहानी झालेल्या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाई पोटी महाविकास आघाडी सरकार कडून ५७ लाख रुपयांचा पहिला हप्ता महसूल विभागाकडे जमा झाला आहे. गेले सहा महिने शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी हे खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दिपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्याकडे पाठपुरावा करत होते त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून या नुकसान भरपाईचा पहिला हप्ता महसूल खात्याकडे जमा झाला आहे. याचे वाटप दिवाळी पूर्वी करण्यात यावे अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख बाबुराब धुरी यांनी दोडामार्ग तहसीलदार यांचे कडे केली आहे.
कोनाळकट्टा, वायगणतड, घोटगे, परमे, झोळंबे, कुंब्रल, कुडासे, मणेरी, सासोली तसेच इतर अनेक गावातील लोकांचे या पुरपरिस्थितीने मोठे नुकसान झाले होते, याचे त्यावेळी शासनाने पंचनामे करून मदत जाहीर केली होती. ही मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्फत राज्य शासनाने महसूल विभागाकडे जमा केली असून ५७ लाख इतका निधी जमा केला आहे. या निधीचे दिवाळी पूर्वी पुरग्रस्ताना वाटप करून महसूल विभागाने या पुरग्रस्ताना दिलासा द्यावा अशी मागणी दोडामार्ग तालुका शिवसेना प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य व नियोजन समिती सदस्य बाबुराव धुरी यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + one =