You are currently viewing फोंडाघाट येथे श्री अनिवृद्ध महाराज पादुकांचे पूजन

फोंडाघाट येथे श्री अनिवृद्ध महाराज पादुकांचे पूजन

फोंडाघाट येथे श्री अनिवृद्ध महाराज पादुकांचे पूजन; भक्तिमय वातावरणात प्रसाद वाटप

फोंडाघाट :

येथील श्री मारुती मंदिरात श्री अनिवृद्ध महाराज यांच्या पादुकांचे पूजन व प्रसाद वाटपाचा कार्यक्रम भक्तिभावाने संपन्न झाला. यावेळी श्री. सुंदर पारकर उभायीता यांच्या हस्ते पाद्यपूजा करण्यात आली. कार्यक्रमानिमित्त मंदिर परिसरात भक्तिमय आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते.
दुपारी आरतीचे आयोजन करण्यात आले असून, फोंडाघाटमधील भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. दर शनिवारी याच ठिकाणी नियमित सायंकाळी उपासना होत असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी मंदिराला भेट देत श्री अनिवृद्ध महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित भक्तांमध्ये आध्यात्मिक ऊर्जा आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा