You are currently viewing शिवसेनेचे उभादांडा सरपंच देवेंद्र डिचोलकर भाजपमध्ये दाखल…

शिवसेनेचे उभादांडा सरपंच देवेंद्र डिचोलकर भाजपमध्ये दाखल…

रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत प्रवेश; गावाच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन…

वेंगुर्ले

उभादांडा येथील शिवसेनेचे सरपंच देवेंद्र डिचोलकर यांनी आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश झाल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान गावच्या विकासासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे श्री. डिचोलकर यांनी स्पष्ट केले. यावेळी श्री. चव्हाण यांनी निश्चितपणे गावाच्या विकाससाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. गोवा येथील एका खाजगी कार्यक्रमात हा प्रवेश घेण्यात आला.
यावेळी वेंगुर्ले माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, दादू कविटकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + nine =