You are currently viewing भिरवंडेत ६०१ तर तोंडवली बावशीमध्ये ९२२ मतदारांनी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत बजावला मतदानाचा हक्क

भिरवंडेत ६०१ तर तोंडवली बावशीमध्ये ९२२ मतदारांनी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत बजावला मतदानाचा हक्क

निवासी नायब तहसीलदार सुजाता पाटील यांची माहिती

कणकवली​ :

कणकवली तालुक्‍यातील तोंडवली बावशी व भिरवंडे या दोन ग्रामपंचा​​य​​​तीं​​साठी ​दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मतदानाची सरासरी टक्केवारी कमी होती. भिरवंडे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६७.७६​ टक्के म्हणजे​ ​६०१​ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर तोंडवली – बावशीमध्ये दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ​९२२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तोंडवली बावशी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी साडेतीन वाजेपर्यंत ​७५.५७ टक्के मतदान झाले. तोंडवली बावशी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप व शिवसेनेमध्ये चुरस असून येथे भाजपने आपली ताक​द पणाला लावली आहे. तर या निवडणुकीत शिवसेनेने तोंडवली बावशी ग्रामपंचायत आपल्याकडे राखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आहेत. भाजपाच्या व शिवसेनेच्या बुथवर सकाळपासूनच गर्दी होती. भिरवंडे येथील मतदान केंद्रावर दुपारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी आणण्यासाठी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून कसोशीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + 4 =