मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
माटुंगा येथील सेवा मंडळ सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम पी शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचा वार्षिक पुरस्कार सोहळा थाटात संपन्न झाला. ह्या सोहळ्यास उद्धघाटक मुख्य अतिथी भारती पाठक, राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय प्रमुख डॉ. विनोद झालटे, डॉ. भरत पाठक, अतुल संघवी, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना पत्की, उपप्राचार्य डॉ. अवनीश भट्ट, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा. संगीता सिंह आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रजल्वन करण्यात आले. सेवा मंडळ सोसायटीचे सेक्रटरी डॉ. भरत पाठक, प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी सर्व मान्यवरांचे संस्थेच्यावतीने शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. तसेच शिक्षण, साहित्य आणि समाज या क्षेत्रासाठी सदैव तत्पर असणारे चंद्रवीर बंशीधर यादव आणि मनोज वाडिया यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर ‘सेव द गर्ल चाइल्ड प्रोजेक्ट’ अंतर्गत ३५० विद्यार्थिंनीना कपडे वाटप केल्याबद्दल रीता अतुल संघवी यांचाही सम्मान करण्यात आला.
पूर्ण वर्षभर राष्ट्रीय सेवा योजनेत सक्रिय असणाऱ्य़ा ३४ स्वसंसेवक विद्यार्थिंनीना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. रेखा शेलार यांनी वार्षिक अहवाल सादर केला. ह्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी भारती पाठक आणि डॉ. विनोद झालटे यांनी विद्यार्थिंनींचे कौतुक करून त्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमणी नायडू आणि कोमल रामपूरे यांनी केले.