You are currently viewing बोअरवेल पुर्नरभरण कामास सिंधुदुर्गातून पहीला प्रारंभ असलदे येथून

बोअरवेल पुर्नरभरण कामास सिंधुदुर्गातून पहीला प्रारंभ असलदे येथून

कणकवली

कणकवली तालुक्यातील असलदे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बोअरवेल पुर्नरभरण कामास सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्गात जिल्ह्यातील हा पहीलाच प्रारंभ असल्याने असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
असलदे ग्रामपंचायतीच्या पंधरा वित्त आयोगाच्या माध्यमातून पावसाचे पाणी संकलन करून बोअरवेल पुर्नरभरण करणे या कामांची सुरुवात करण्यात आली.त्यासाठी प्राथमिक शाळा असलदे तावडेवाडी , मधली वाडी, गणेश मंदिर उगवती वाडी छताचे पाणी पन्हळाने एकत्र करून फिल्टर मधून विंधन विहीरीच्या मुख्य पाईपला जोडले जाते.यातील दोन कामे पूर्ण होऊन तिसरे काम प्रगतीपथावर आहे.व बोअरवेल मधे ते पाणी सोडले जाते.पहील्या पावसाचे खराब कचरा युक्त पाणी बाहेर सोडण्यासाठी त्याला वॉल लावून बाहेर सोडण्याची व्यवस्था केली आहे.अशा प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहील्यांदाच अशा प्रकल्पाचा प्रयोग करण्यात येत आहे.

जिल्हा सरपंच संघटनेचे सचिव व पणदूर गावचे सरपंच दादा साहील यांनी ही प्रत्येक्षात उपस्थित राहून पाहणी करून आपल्या गावात ही ही योजना राबविण्यात येणार आहे तसेच जिल्ह्यातील सरपंचांनी आपापल्या गावांमध्ये बोअरवेल पुर्नरभरण करून पाण्याची पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करावे. नवनवीन उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेली ग्रामपंचायत म्हणून असलदे ग्रामपंचायतची ओळख आहे. ग्रामपंचायत सरपंच पंढरी वायंगणकर उपसरपंच संतोष परब ग्रामसेवक आर.डी . सावंत,व ग्रामपंचायत सदस्य यांनी ही कामे मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहे .
दिवसेंदिवस वाढत चालली उष्णतेमुळे पाण्याच्या पातळीत कमालीची खालावली असून ही वाढविण्यासाठी असे बोअरवेल पुर्नरभरण करून पाण्याची पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन सरपंच पंढरी वायंगणकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा