You are currently viewing कुडाळ-कुंदे येथील श्री राजसत्ता विठ्ठलादेवीचा वर्धापनदिन उत्साहात…

कुडाळ-कुंदे येथील श्री राजसत्ता विठ्ठलादेवीचा वर्धापनदिन उत्साहात…

कुडाळ-कुंदे येथील श्री राजसत्ता विठ्ठलादेवीचा वर्धापनदिन उत्साहात…

कुडाळ

तालुक्यातील कुंदे येथील आदिशक्तीस्वरूपा श्री राजसत्ता विठ्ठलादेवीचा सोळावा वर्धापनदीन सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमानी उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी देवीच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती.

यनिमित्त सकाळी श्रींच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. सत्यनारायण पूजा झाल्यानंतर महाआरती, महाप्रसाद, महिलांचे हळदीकुंकू आदी कार्यक्रम संपन्न झालेत. देवीची ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम करण्यात आले. सायंकाळी गावातील स्थानिकांचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम झाला. नंतर रात्री आजगावकर दशावतारी नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. या धार्मिक कार्यक्रमाचा भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा