You are currently viewing वैभववाडी तालुक्यामध्ये स्केटिंग रॅली व स्केटिंग वरती डान्स कार्यक्रम संपन्न

वैभववाडी तालुक्यामध्ये स्केटिंग रॅली व स्केटिंग वरती डान्स कार्यक्रम संपन्न

आलिशा स्केटिंग अकॅडमी व नृत्य कला मंदिर कथक वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या स्केटिंग रॅलीचे वट स्केटिंग डान्स चे आयोजन

वैभववाडी

तालुक्यात आलिशा स्केटिंग अकॅडमी व नृत्य कला मंदिर कथक वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या स्केटिंग रॅलीचे वट स्केटिंग डान्स चे आयोजन करण्यात आले होते. कथक प्रशिक्षक जयेश शेळके व स्केटिंग प्रशिक्षक विशाल देसाई यांनी या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन वैभववाडी तालुक्यात भव्य रॅली काढली, या रॅलीमध्ये कोरोना नियमाचे पालन कसे करावे या आशयाचे संदेश संपूर्ण वैभववाडी तालुक्यात फिरवण्यात आले व जनजागृती करण्यात आली. तर स्केटिंग वरती उत्कृष्ट प्रकारे डान्स विद्यार्थ्याने सादर केला. स्केटिंग वरती डान्स करणे अत्यंत कसरतीचे असतानादेखील अल्पशा वयात या सर्व विद्यार्थ्यांनी आपली कलाकृती दाखवली. या संपूर्ण डान्सचे कोरियोग्राफी कथक प्रशिक्षक जयेश शेळके यांनी केले.
या या कार्यक्रमात सत्यजित सत्यवान शेळके,अनिरुद्ध धनाजी सरवलकर,संचली संदीप तुळसकर,संजीत संदीप तुळसकर,अथर्व नारायण सुळेभावी,शौर्य चेतन बोडेकर,धैर्य चेतन बोडेकर,लव शांताराम कोलते,योगिता काळे,स्वरूप तोडकर,रुद्र रावराणे,पार्थ संदीप रावराणे,विघ्नेश सुभान नवलू,मेघराज दीपक यादव,केशव सळवळकर,अथर्व अमर पाटील,रूद्र प्रकाश रावराणे,रुद्र संतोष माईनकर,स्वरूप स्वप्नील तोडकर,शर्मिष्ठा मनोज तळेकर,विराज चव्हाण,प्रसाद राजेश सरवणकर,स्वरूप सुनील कुंभार,आदित्य अमित गोखले,साईराज सर्वल्कर,भुमिका यादव,चीनमय शीण्ग्रे,स्वराज चाफ़े या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.या स्केटिंग रॅलीने प्रत्येक कार्यालया ला भेट देत संपूर्ण बाजारपेठ मध्ये जनजागृती केली. या कार्यक्रमाला वैभववाडी तालुका तहसीलदार रामदास झळके, पोलीस कॉन्स्टेबल शिंगारे, ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे, ग्रामसेवक उमेश राठोड, Adv.विक्रमसिंह काळे, पत्रकार संजय शेळके, आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 1 =