You are currently viewing महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा वाघेरीत प्रचाराचा शुभारंभ

महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा वाघेरीत प्रचाराचा शुभारंभ

महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा वाघेरीत प्रचाराचा शुभारंभ

ग्रामदेवतेचे घेतले दर्शन, आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रचाराची झाली सुरुवात

कणकवली :

वाघेरी मठखुर्द गावचे ग्रामदैवत श्री देव लिंगेश्वर पावणादेवी देवस्थानचे दर्शन घेत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या घरोघरी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत या प्रचाराला सुरुवात झाली. भाजप महायुतीचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामदेवतेला श्रीफळ देऊन या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी आमदार नितेश राणे यांच्या समवेत भाजप विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख मनोज रावराणे तालुका अध्यक्ष संतोष कानडे,माजी सरपंच संतोष राणे, सुहास राणे,बूथ कमिटी अध्यक्ष सचिन राणे,ग्रामपंचायत सदस्य किशोर राणे, रवी सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य महेश राणे, यांच्यासह असंख्य भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा