तैवानमध्ये रेल्वे रुळावरुन घसरली!

तैवानमध्ये रेल्वे रुळावरुन घसरली!

३६प्रवाशांचा मृत्यूूू तर ७२जखमी

पूर्व तैवानमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. रेल्वे रूळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 36 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 72 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून वेगाने बचावकार्य सुरू आहे.

तैवानच्या परिवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रेल्वे रूळावरून एक ट्रेन घसरली.

प्रतिक्रिया व्यक्त करा