You are currently viewing सिंधुदुर्गात कोविड प्रतिबंधक लसीची तीव्र टंचाई शासनाचे दुर्लक्ष

सिंधुदुर्गात कोविड प्रतिबंधक लसीची तीव्र टंचाई शासनाचे दुर्लक्ष

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लस टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. मालवणमध्ये काल लस संपली. देवगड मध्ये उपकेंद्रातील लस संपुष्टात आली असून केवळ ग्रामीण रुग्णालयात आजचा दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा आहे. सिंधुदुर्गातील आरोग्य उपकेंद्रातील बहुतांशी ठिकाणची लस संपली आहे. यामुळे कोविड लसीच्या कार्यक्रमावर अनिश्चिततेचे संकट निर्माण झाले आहे.

वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लसीचा साठा संपवा असा आदेश असल्याचे ते सांगत असले तरी लसीची टंचाई निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. सध्या दोन प्रकारे लस दिली जात आहे. यात सिरम कंपनी ची कोविशील्ड ही लस आहे. या लसीचा बूस्टर डोस घेण्यास 42 दिवसाची मुदत असते. तर भारत बायोटेक कंपनीची कोव्हॅक्सिन ही लस 28 दिवसाच्या मुदतीची आहे. यातील कोविशील्ड ही लस संपुष्टात आली आहे. तर कोविशिल्ड चा दुसरा डोस शिल्लक आहे. कोविड मधून मुक्त व्हायचे असेल तर लसीकरणा शिवाय दुसरा मार्ग नाही. मात्र लसीचा तुटवडा तातडीने दूर करणे गरजेचे आहे. काही दिवसापूर्वी लस शिल्लक होती मात्र 45 वर्षावरील सर्वांनाच लसीकरण मोहीम सुरू झाल्याने आता लसीचा साठा शासनाने वाढवला पाहिजे. आज सिंधुदुर्गसाठी अडीच हजार लसीचा डोस येणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले मात्र ही लस एकाच दिवसाला पुरेल एवढी असणार आहे . आता किमान लस तरी वेळेत द्या. अशी मागणी नागरिक करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 17 =