You are currently viewing जि. प. शाळा सोनाळी नं.१ मध्ये योग दिन उत्साहात संपन्न..

जि. प. शाळा सोनाळी नं.१ मध्ये योग दिन उत्साहात संपन्न..

*सांगुळवाडी कृषी महाविद्यालयाच्या कृषीदुतांकडून प्रात्यक्षिकांचे सादरीकरण.*

 

वैभववाडी / प्रतिनिधी :

 

आज सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वैभववाडी तालुक्यातील जि. प. शाळा सोनाळी नं १ मध्ये योग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी सांगुळवाडी कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना विविध योगा प्रात्यक्षिके सादर करून दाखवली शिवाय नियमीत योगासने केल्याने माणसाचे आरोग्य तंदुरुस्त राहते व अन्य शारीरिक फायदे याबाबत शिक्षकांनी व कृषिदूतांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी जि. प. शाळा सोनाळी नं.१ चे मुख्याध्यापक दिनकर केळकर,ज्योत्सना पाटील, प्रियांका रावराणे, श्रुती पालांडे, आणि कृषी महाविद्यालय सांगुळवाडी येथील कृषीदूत श्रीधर मोरे, रणजीत पाटील,आदेश ढमाळ, जयकुमार माने, रोहित लावंड, योगेश माईन, सुरज मोहिते, तेजस गांगण व सोनाळी प्राथमिक शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा