You are currently viewing माळरानावर व्हेलमाशा उलटीसदृश पदार्थाचे तुकडे जप्त

माळरानावर व्हेलमाशा उलटीसदृश पदार्थाचे तुकडे जप्त

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

 

मालवण:

 

मालवण वेरळ माळरानावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने २४ किलो २६४ ग्रॅम वजनाच्या व्हेलची उलटीसदृश पदार्थाचे तुकडे शुक्रवारी सायंकाळी जप्त केले आहेत. २५ कोटी किंमतीची व्हेल मासा उलटी सदृश पदार्थ आहे. एका सुत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल आणि अप्पर पोलिस अधिक्षक नितीन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणात नऊ संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत दोन चारचाकी आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी या घटेनची माहिती वन विभागाला दिली आहे. पुढील कारवाई सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + 14 =