You are currently viewing केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या उपस्थितीतीत कुडाळ येथे भाजपाचा पदाधिकारी संवाद मेळावा…

केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या उपस्थितीतीत कुडाळ येथे भाजपाचा पदाधिकारी संवाद मेळावा…

कुडाळ

तालुक्यातील भाजपाच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा शनिवारी २२ एप्रिल रोजी सकाळी १०.०० वाजता महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्यासह भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खा.निलेशजी राणे, जिल्हाध्यक्ष राजनजी तेली, संघटन मंत्री शैलेंद्रजी दळवी मार्गदर्शन करणार आहेत.

या मेळाव्यात बुथ सक्षमीकरण आणि आगामी निवडणुका या विषयावर आढावा आणि मार्गदर्शन होणार आहे. यासाठी भाजपाच्या सर्व जिल्हा आणि तालुका(मंडल) पदाधिकारी, सर्व मोर्चा/आघाडी पदाधिकारी, बुथ अध्यक्ष आणि पदाधिकारी, शक्ति केंद्रप्रमुख, शक्तिकेंद्र प्रभारी, जिल्हापरिषद प्रभारी, आजी माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच/उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास संस्था चेअरमन, सहकारातील पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांनी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा