You are currently viewing वरवडे प्रा. आ. केंद्रात २२ सप्टेंबरला रक्तदान शिबिर

वरवडे प्रा. आ. केंद्रात २२ सप्टेंबरला रक्तदान शिबिर

छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचा उपक्रम

कणकवली

कणकवली येथील छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. आ. केंद्र वरवडे येथे २२ सप्टेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरुण तरुणींनी या शिबिरात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन गरजूंना रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

बुधवार २२ सप्टेंबर, २०२१ सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १८ ते ५५ वर्षे वयोगटातील तरुण तरुणींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे. ज्यांची पाहिली किंवा दुसरी कोविड प्रतिबंधात्मक लस घेऊन १४ दिवस पूर्ण झाले आहेत, त्यांनाही रक्तदान करता येईल, असे आयोजकांमार्फत कळविण्यात आले आहे. इच्छुक रक्तदात्यांनी खालील नंबर वर संपर्क साधावा.धनंजय सावंत :- 9404936944 संदेश कडुलकर :- 9637432223 ,अमेय मडव :- 9619326057,संतोष मेस्त्री :- 7218518713,अनुप वारंग :- 9822361036 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × five =