You are currently viewing प्रा.डॉ.नाऊ वरक याचा मान्यवरांच्या हस्ते हृद्यसत्कार

प्रा.डॉ.नाऊ वरक याचा मान्यवरांच्या हस्ते हृद्यसत्कार

*प्रा.डॉ.नाऊ वरक याचा मान्यवरांच्या हस्ते हृद्यसत्कार*

सावंतवाडी

आपल्या जिद्दीने आणि संघर्षाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून माडखोलमधील बामणाईदेवी वाडी या दुर्गम भागातील धनगर समाजातील एक युवक नाऊ वरक याचा प्रा डॉ नाऊ वरक बनण्याचा प्रवास आज सावंतवाडी येथील डॉ.परूळेकर नर्सिंग होमच्या प्रांगणात उपस्थित अनेक मान्यवरांनी अनुभवला.

या प्रसंगी डॉ नाऊ वरक याचा शाल श्रीफळ देऊन मालवण येथील श्री बाळासाहेब पंतवालावलकर यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सिंधुरत्न फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ जयेंद्र परुळेकर, डॉ मिलिंद कुलकर्णी, सचिव डॉ किरण गुजर, डॉ संजय सावंत व्यासपीठावर उपस्थित होते.

आपल्या प्रास्ताविक भाषणात डॉ मिलिंद कुलकर्णी यांनी गेल्या दहा बारा वर्षातील नाऊचा प्रवास आपल्या ओघवत्या शैलीत मांडला तसेच नाऊला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे काही निवडक ग्रंथ भेट म्हणून दिले.
“ज्या मातीतून तू ही झेप घेतली आहेस त्या मातीला कधीच विसरू नकोस” असा प्रेमपूर्वक सल्ला देखील त्यांनी डॉ नाऊला या प्रसंगी दिला.

मालवण येथील ज्येष्ठ समाजसेवक श्री बाळासाहेब पंतवालावलकर, ज्यांनी त्या काळी नाऊला मुंबईत आपल्या फ्लॅटमध्ये तीन वर्षे त्याची राहण्याची सोय केली, त्यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन डॉ नाऊचा सत्कार करण्यात आला.

डॉ जयेंद्र परुळेकर यांनी २००८ पासून आतापर्यंतचा नाऊचा संघर्षमय प्रवास उलगडून सांगितला. कशारितीने त्याची बीएच्या पहिल्या वर्षात रुईया महाविद्यालयात ॲडमिशन झाली, त्यासाठी ज्येष्ठ पत्रकार समर खडस यांची मोलाची मदत कशी झाली.
दादर हिंदू काॅलनीतील पंतवालावलकर यांच्या फ्लॅटमध्ये राहायची सोय आणि दादर मधील लक्ष्य ॲकेडमी मध्ये युपीएससी कोचिंगचा प्रवास त्यांनी मांडला.

त्या नंतर एम ए करण्यासाठी कसा नाऊ एक कठीण प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन दिल्लीतील जे एन यू विद्यापीठात गेला आणि नंतर काही अडचणींमुळे गोवा येथील महाविद्यालयात पाॅलिटीकल सायन्स शिकवत त्याने आज पीएचडी मिळवली हे सांगत असताना डॉ जयेंद्र परुळेकर भावूक झाले.
थोडसा मदतीचा हात दिल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलं कसं मोठं यश संपादन करू शकतात याचं डॉ नाऊ वरक हे एक जीवंत उदाहरण आहे, असं या प्रसंगी बोलताना ते म्हणाले.

आपल्या सत्काराला उत्तर देताना डॉ नाऊने मुंबई मधील आपले दिवस, रुईया महाविद्यालयातील महत्त्वाचे वैचारिक वातावरण,
जे एन यू प्रवेश परीक्षा, जे एन यू मधील मंतरलेले दिवस आणि मग गोवा युनिव्हर्सिटीमधून पीएचडी हा सगळा गेल्या पंधरा वर्षांचा प्रवास विस्ताराने मांडला.

डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या सह पंतवालावलकर तसेच समर खडस, तिर्थराज सामंत, राजेंद्र फातरपेकर, रुईयातील त्याचे प्राध्यापक, सहकारी मित्र अशा अनेकांचे डॉ नाऊ याने मनापासून आभार मानले.
पीएचडीच्या आपल्या शोधनिबंधाबद्दल देखील त्याने विस्तारपूर्वक अनेक बाबी मांडल्या.
या प्रसंगी डॉ सौ लीना परूळेकर,
डॉ नाऊ याच्या पत्नी प्रा डॉ प्राची नाईक वरक, मालवण येथील डॉ राहुल पंतवालावलकर, मुंबई येथील त्यांचे काका श्री.पंतवालावलकर, तळेरे येथील डॉ सुखानंद भागवत, सावंतवाडी येथील फिजिशियन डॉ निर्मला सावंत, स्त्री रोगतज्ञ डॉ मृदुला महाबळ अंबापुरकर, डॉ विजया चिंडक पाटील व श्रीमती मराठे,कुडाळ येथील डॉ सवदत्ती, माणगाव येथील डॉ गुरू गणपत्ये, मालवणी कवी दादा मडकईकर, कणकवली येथील व्ही.के. सावंत, वैशाली सावंत, दीपक पटेकर, आनंद परूळेकर,नकुल पार्सेकर, दिलीप निर्गुण,रवी जाधव असे अनेक मान्यवर तसेच विविध वृत्तपत्रांचे आणि डिजिटल वाहिन्यांचे पत्रकार उपस्थित होते.

आयोजनासाठी सामाजिक बांधिलकी या संस्थेचे रवी जाधव आणि विनायक कांडरकर यांनी विशेष परिश्रम घेतले .

*संवाद मीडिया*

*🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर 🥳*

*🎼🎼. म्युझिक काॅर्नर 🎼🎼*

*🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️घेऊन येत आहे खास आपल्यासाठी 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️*

✴️ *डबल ट्रीपल धमाका ऑफर* ✴️

❇️ऑफर दिनांक *22/10/2023* ते *22/11/2023*

🌇 *BEST OFFER* 🌇

✴️1st Winner: 🛵 *TVS Zest Two Wheeler*

✴️2nd Winner: 📱 *Redmi 12 5G*

✴️3rd Winner:🖥️ *32″inch Smart LED TV*

🔸फायनान्स आणि खरेदीवर *5990/-* रूपयांच्या पुढे 🌇 *कोणत्याही वस्तूवर एक लकी ड्राॅ कुपन* घ्या व सहभागी व्हा📦🤷🏻‍♂️ लकी ड्राॅ मध्ये 🌅

🔹 *0% Bajaj Finserv*
🔹 *0% interest*
🔸 *No Down Payment*

📱 *मोबाईल खरेदीवर 2 वर्ष वाॅरंटी*
🖥️ *LED TV वर 2 ते 3 वर्ष वाॅरंटी*

*❇️वाॅशिंग मशीन, फ्रीज, ए.ई.डी. टीव्ही व मोबाईल🔸 *एक्सचेंज सुविधा* *🔸उपलब्ध❇️ ( नियम व अटी लागू )*

🛣️ *पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📱8799978651*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113482/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा