You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूविकास बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देय रक्कम त्वरीत मिळावी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूविकास बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देय रक्कम त्वरीत मिळावी

शिवसेना नेते श्री.संदेश पारकर यांची सहकारमंत्री श्री.बाळासाहेब पाटील यांच्याकडे मागणी

सिंधुदुर्ग भूविकास बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सन २००९ पासूनची सेवानिवृत्ती पश्चात मिळणारी रक्कम रु.१३.५० कोटी अद्यापहि प्राप्त झालेली नाही. सिंधुदुर्ग भूविकास बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी आपली सुमारे १३.५० कोटी रुपयांची देणी मिळणेसंदर्भात दि.२६ जानेवारी २०२१ रोजी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचे कार्यालयासमोर उपोषण केले होते. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन या संदर्भात शिवसेना नेते श्री.संदेश पारकर यांनी सहकारमंत्री श्री.बाळासाहेब पाटील यांची मुंबई येथील शासकीय निवासस्थानी भेट घेतली व त्यासंबंधी मागणीचे निवेदन दिले.

दि.२४ जुलै २०१५ च्या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांची देणी बँकांची स्थावर मालमत्ता विक्री करून किंवा येणे कर्ज रक्कम वसूल करून अदा करावी असे नमूद आहे. परंतु सिंधुदुर्ग जिल्हा भूविकास बँकेचे कोणत्याही प्रकारची स्थांवर मालमत्ता नाही अगर पुरेशी कर्ज येणे बाकी नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग भूविकास बँक निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी भागवू शकत नाही.

दिनांक २४ जुलै २०१५ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा बँकेकडे स्थावर मालमत्ता व पुरेशी कर्ज येणे बाकी नसल्याने शिखर बँक मुंबई तसेच इतर जिल्हा भूविकास बँकांकडे शिल्लक असलेल्या निधीमधून विशेष बाब म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७१ कर्मचाऱ्यांची देय असलेली रक्कम अदा करणेत यावी यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करण्यात यावी व सदर बैठकीस माझ्यासह संघटना प्रतिनिधींना बोलावण्यात यावे अशी मागणी श्री.पारकर यांनी सहकारमंत्री श्री.पाटील यांच्याकडे केली. सहकारमंत्र्यांनी संदेश पारकर यांच्या मागणीची त्वरीत दखल घेऊन मंत्रालय स्तरावर बैठक लावण्याचे आदेश दिलेत.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पाठीशी शिवसेना भक्कमपणे उभी असुन खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक हे देखील मंत्रालय स्तरावरील बैठकीस उपस्थित राहणार असल्याचे संदेश पारकर यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − 2 =