जिजाऊ संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप; प्रमोदजी रावराणे यांच्या प्रयत्नांना यश
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी स्तुत्य उपक्रम; मान्यवरांच्या उपस्थितीत वह्यांचे वितरण
वैभववाडी
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि शैक्षणिक साहित्याची मदत व्हावी, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने तसेच जिल्हा परिषद सदस्य श्री. प्रमोदजी रावराणे यांच्या विशेष प्रयत्नातून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य वैभववाडी सन्मा. सौ. सुवर्णा संसारे, जिजाऊ संस्थेचे समन्वयक श्री. स्वरूप सावंत, कोकण विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. महेश संसारे, संचालक श्री. शरद कांबळे, स्कूल समिती सदस्य श्री. राजेंद्र राणे, मुख्याध्यापिका सौ. भारती भोसले, शिक्षक श्री. मोरे, श्री. कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळावी, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने राबविण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.
यावेळी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे समन्वयक श्री. स्वरूप सावंत यांनी सन्माननीय निलेश सांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनातून व योगदानातून शाळा आणि संस्थेला विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांसाठी भविष्यातही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. जिजाऊ संस्थेच्या या पुढाकाराचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
