You are currently viewing मला समजलेली मराठी रंगभूमी
Oplus_16908288

मला समजलेली मराठी रंगभूमी

*जागतिक साकव्य विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*मला समजलेली मराठी रंगभूमी*

 

वैदिक कालापासुन भारतात देवांना प्रसन्न करण्यासाठी गायन, वादन, व नर्तन प्रचलित होतं . ती सेवा करून श्री. शंकर, विष्णू यांना प्रसन्न करून असूर, दैत्य याच्या अन्याय अधर्म व अराजकतेवर विजय मिळवला जायचा. त्यांत जेव्हा संवाद चालू झाला तेव्हा नाट्यकला ऊदयाला आली.

ज्ञानेश्वरांच्या काळातही काही प्रसहने केलेली आहेत. पूर्वी हीच मनोरंजनाची साधने होती. किर्तन, प्रवचन, भारूड, सोंगीभजन, लळित, दशावतारी खेळ, कठपुतळी आपला वासूदेव बहुरूपीये. हे असेच मनोरंजन करत. शिवाय गायन नर्तन वादन, लावणी, तमाशा हे पण लोकप्रिय होते.

तेव्हा बैठकीची लावणी, नर्तन, गायन यांना खास राजाश्रय होता.

यातुनच पुढे राजस्तूती करणारे भाट, वीर रसांनी भरलेली गाणी गाणारे पोवाडे गाणारे शाहिर मनोरंजन करत.

यातुन मनोरंजनाबरोबरच समाजप्रबोधनही झाले. जातीयता, अस्पृष्यता, दलितांवरचे अत्याचार , जून्या जाचक परंपरा, रूढी ऊखडून लावल्या व भक्ती मार्ग , बंधूत्व, मानवता, भूतदया समाजात निर्माण केली गेली.

वारकरी पंथ यातुनच निर्माण झाला व संतसाहित्यावर भारूडे, प्रहसने किर्तने खुपच लोकप्रिय झाली

या नाट्यकलेच्या लोकरंगभूमी, लोक साहित्य ह्या रूपात जणू नाट्यकलेची सुरवात झाली.

लोकांना रंगमंच, संवाद, संगीत इ. आवडू लागले.

रंगभूमी, रंगमंच आणि संवादासह संगीत या तंत्रावर भर देत.५नोव्हें. १८४३ साली सांगली संस्थानात आधुनिक परिपूर्ण सर्व तंत्रांचे भान अभ्यास करून ‘पौराणिक ‘नाटक ‘सीता स्वयंवर’ खच्चून भरलेल्या प्रेक्षकांसमोर सादर केले केले. मोठा विजयच होता तो!

कै. विष्णूदास भावे यांनीहे धाडस करून वाहवा मिळवली म्हणुनच त्यांना भारतीय रंगभूमीचे आद्यजनक मानतात तर ५नोव्हेंबर हा ‘मराठी रंगभूमी दिन ‘ म्हणुन साजरा होतो. तेव्हा राजाश्रय, ब्रिटिशांचेही प्रोत्साहन होते.

काळ जसा पुढे सरकत होता तसं नवनविन सुधारणांचे प्रयोग होऊ लागले.

कोकणात व ऊत्तरेकडे दशावतारी सोंगे नाटके करत. आता पर्यंत स्त्री ही ऊंबरठ्याच्या आत असल्याने पुरूषच स्त्री भूमिका करत. त्याची मजा व किस्से होत. अशा भूमिका करणारे केस वाढवत, थोडे बायकी आवाजात बोलत. काहीवेळा भूमिकेची वेळ आली तरी हे स्त्रीपार्टे वेषभूषेत तयार असुनही झोपी जात. व आयत्या वेळी जागे झाल्याने संवादाची ऐशी का तैशी करून टाकत तर सीतेचा, मंदोदरी, द्रौपदीची भूमिका करणा-यांना मिशाच दिसत. कधी शकुंतला पडद्यामागे जाऊन विडीची तल्लफ भागवून मगच पुढची भूमिका करत. पण सारे मजेत हंसण्यावारी नेले जाई कारण पर्यायच नसे.

आधुनिक नाट्यकला रंगमंचावर आल्यावर ही सारी मनोरंजनाची म्हणजेच नाटकांचीच पिल्लावळ मागे पडली.

यातले कठपूतळी राजाश्रयावर चालत राहिली.

अशी परिस्थिती असताना आपल्याकडे विष्णूदास भावे, कृष्णाजी बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, अण्णासाहेब किर्लोस्कर, यानी नवनविन प्रयोग करून नाट्य रंगभूमीला सोन्याचे दिवस दाखवले.

यातही किर्लोस्करांनी सुंदर अभिजात गायकी वापरली,

देवलांनी पौराणिक संस्कृत नाटके मराठीत भाषांतर करवून आणली, कोल्हटकरांनी रहस्यमय नाटके आणली.काहींनी विनोदी बाज असलेली ऊभी केली. सावरकरांनी ब्रिटिशांना ठणकावण्यासाठी देशभक्तीवरची संघर्षमय नाटके आणली. एकूणच यात मोठी क्रांती होत गेली.

रेकॉर्डींग ऐवजी नट स्वत:गात. वन्समोअर मिळाला तर परत गात अशी पहाट झाली तरी संगीत नाटके संपत नसत. एखाद्या लग्नाला जावे तसे नटून सजून त्यावेळचा प्रतिष्ठीत वर्ग नाटकांना तर स्त्रीया वरच्या पडदाशीन बाल्कनीत बसुन आनंद घेत.

मात्र नाट्यरचना तंत्रावर भर, लेखन कौशल्य, नटप्रधान संवाद व संगीत, थोडा विनोदी बाज, यावरच ही नाटके लोकप्रिय होत गेली. यातुनच अभिजात गायकी, शास्त्रीय संगीत खुपच लोकप्रिय झाले आणि यावरच नाटके चालली.

पूर्वी रंगभूमीवर मुख्य मालकाची नाटक कंपनी असे. तिथेच हे कलाकार रहात खात पीत व पगार मिळे. सरावही भरपूर होत असे.

याची काळी बाजू म्हणजे इथे व्यसने फोफावली, रोग वाढले, एखादे नाटक चालले नाहीतर कंपनी दिवाळ्यात जायची व नट मंडळी कलाकार देशोधडीला लागत. घरसंसारावर जप्ती येई. तेव्हा यांचे हाल कोणी खात नसे.

खाडिलकरांचे लक्ष श्री. नारायण राव राजहंस यांच्याकडे लक्षवेधक गायकी व खानदानी रूप यामुळे गेलेऊत्तम व मधूर गायकी, खानदानी नजाकतवाले रूप स्त्रीसुलभ पोषाख अभिजात कलाविष्कार, बोलणे, हंसणे, असल्याने मराठी रंगभूमीवर गंधर्व हा हिरा खूप गाजला चमकला. ती न ऊवारी नेसण्याची पद्धतच निघाली. अतिशय सुंदर दिसत.

गंधर्वांनी नाट्यकलेला रंगभूमीला प्रतिष्ठा, लोकप्रियता मिळवून दिली.

विषय साधारण पौराणिक व ऐतीहासिक असत. पुढे कालीदासाची संस्कृत नाटके भाषांतरित होऊन रंगमंचावर आली. त्यातले ‘शाकूंतल’ खूप गाजले. याच नाटकात सुरवात ही श्री. नटेश्वराची स्तूती, पूजा करून पडद्याला हार घालून व श्रीफळ फोडून करायचा प्रयोग यशस्वी झाला. यात शास्त्रीय राग ऊपयोगात आणुन समुदायात म्हंटले गेलेले हे गीत पुढे नाटकाची ‘नांदी’ म्हणून प्रचलित झाले.

यानंतर कमी खर्चात आलेल्या एकांकिका, एकपात्री, विनोदी फार्स ही लोकप्रीय झाले. प्रतिष्ठीत सुशिक्षित वर्ग रंगभूमीकडे वळला गेला तो शास्त्रीय संगीताचा आधार घेतल्यानंतर. पण या वरील प्रयोगात संगीत असेच असे नव्हते.

काळाबरोबर खुपच सुधारणा प्रायोगिक तत्वावर केल्या गेल्या.वादकांनाही नर्तंकांनाही गायकांइतकेच महत्व आले.

राजाश्रयात विनोदाला फारसा भाव नसे पण पुढील नाटककारांनी केवळ मोठी विनोदी नाटकेही लोकप्रियच नाही तर अजरामरही केली. पु. ल. चे बटाट्याची चाळ.

शिरवाडकरांनी स्वच्छंदी कलाकारांना धडा म्हणून ‘नटसम्राट’, वसंत कानेटकरांनी शिवरायांच्या काळावर ‘रायगडाला जेव्हा जाग येते’,

कट्यार काळजात घुसली,

काशीनाथ घाणेकरांचा ‘लाल्या’अजरामर करणारे ‘अश्रूंची फूले’वेश्यांवरचे ‘,हमीदाबाईची कोठी’,स्वता:पु. ल. च्या भूमिका, या नटासह, संगीतासह, व कलेसह अजरामर झाल्या. अनेक आहेत.

आता समाजातील समस्या मांडण्यासाठी रंगभूमीचा ऊपयोग होऊ लागला त्यातलेच ‘संगीत शारदा’

यात विवाहवयातील फरकावर आसूड ओढले गेले.

रत्नाकर मतकरी, तेंडूलकर, खानोलकर आदी. नी प्रचलित नसणा-या विषयांवरची नाटके आणून रंगभूमी अधिकच आधुनिक केली.

आज नवी नवी तंत्रे वाद्ये, संगीत कलाकार, गायक नर्तक इ. आपल्या कौशल्याने रंगभूमीला अधिकच सन्मान मिळवून देत आहेत. आपली रंगभूमी व कलाकार परदेशातही गाजत आहेत.

हे थोडक्यातच मांडले आहे पण याहुनही ही रंगभूमीची नाट्यपरंपरा अभिमानास्पद आहे. अनेक कलाकार गौरवले गेलेत. मराठी भाषा समृद्ध झाली. काही काळाआड गेले पण कला अमर करून गेले. थोडक्यात रंगभूमीचा ध्यास घेतलेले सर्वच क्षेत्रातले कलाकार पडद्यावरचे व मागचे यांनी रंभूमीचा ‘ध्यास घेत ही परंपरा जपली… वाढवली… देशाबाहेर नेली व अजरामर केली.

ही कौशल्याची परंपरा एखाद्या गंगेप्रमाणे पूढेच वहात जाणार व अभिजात परंपरेचा वारसा पुढच्या अधिकच कुशल पिढीच्या हातात देणार.

 

अनुराधा जोशी.

F 3 / 404

विजयनगर सोसायटी.

प्रतिक्रिया व्यक्त करा