You are currently viewing पाण्यासाठी……

पाण्यासाठी……

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पाण्यासाठी……*

*****************

पाण्याची ओरड घशाला कोरडं

उन्हाची धाप घामाची धार

पायांची वनवन रानोराणी अनवाणी

पाण्यासाठी….

 

डोक्यावर हंडा कंबरेला गूंडा

गर्भार आई लेकुरवाळी माय

उन्हाची झळ पोटाला कळ

रखरखत्या उन्हात पायाला फोड

पाण्यासाठी…..

 

कोसभर वाट कोरडा पाट

पाण्याची गाडी माणसांची झडी

गावचा गाव सगळ्यांची धाव

पाण्यासाठी……

 

पोटाला वार केले निराधार

घागर उताणी डोळ्यात पाणी

येऊ दे द्या आभाळमाय

पावसाला हाक

पाण्यासाठी…….

 

गुर ढोरे हाडांची काडी

झडली पानं सुकली झाडी

भुकेला जीव पाखरांची चिवचिवाट

हरवली सावली देवाला पावली

माणसांच मरण

पाण्यासाठी……

 

*संजय धनगव्हाळ*

(*अर्थात कुसुमाई*)

९४२२८९२६१७

९५७९११३५४७

प्रतिक्रिया व्यक्त करा