You are currently viewing वेंगुर्ले येथील ‘मांडवी खाडी” परिसरात कांदळवनाचे वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम..

वेंगुर्ले येथील ‘मांडवी खाडी” परिसरात कांदळवनाचे वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम..

रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन सह विविध संस्थांचा सहभाग

वेंगुर्ले

रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन, ग्रीन नेचर क्लब, बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय-वेंगुर्ला, कांदळवन प्रतिष्ठान-मालवण, वेंगुर्ला नगरपरिषद, स्वामिनी महिला बचत गट व रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने “मांडवी खाडी” परिसरातील कांदळवनांमध्ये कांदळवनाचे वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

यावेळी प्राध्या. डॉ. धनश्री पाटील, स्वामिनी महिला बचत गटाच्या अध्यक्ष्या व रोट. श्वेता हुले, आय. पी. झेड. आर. आर. रोट. स्वप्निल परब, रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन अध्यक्ष रोट. साहिली निनावे, उपाध्यक्ष रोट. प्रितीश लाड, रोट. निकिता निनावे, रोट.अपुर्वा परब, रोट. मयुरी परब, रोट. पल्लवी भोगटे, रोट. उत्कर्षा गावडे, रोट. दिव्या वायंगणकर, स्वामिनी महिला बचत गटातील सदस्य, रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रल अध्यक्ष रोट. श्रद्धा पाटकर, रोट. अवंतिका कांबळे, रोट. आकांक्षा कदम, रोट. योगिता पेडणेकर तसेच शलाका वालावलकर व रविना गवस आदी या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + five =