You are currently viewing जनजातीय गौरव सेवा सप्ताहांतर्गत गणपती साना येथे स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न

जनजातीय गौरव सेवा सप्ताहांतर्गत गणपती साना येथे स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न

जनजातीय गौरव सेवा सप्ताहांतर्गत गणपती साना येथे स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न

 सिंधुदुर्ग

क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त शासनाच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आलेल्या ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह २०२६’ अंतर्गत आज गणपती साना, ता. कणकवली येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी, सामाजिक न्यायासाठी तसेच जल, जंगल आणि जमीन यांच्या संरक्षणासाठी दिलेला लढा संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा व कार्याचा गौरव करण्याबरोबरच आदिवासी समाजातील पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ मिळवून देणे आणि त्यांना सन्मानाने विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देणे, हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे.

या स्वच्छता मोहिमेस पदाधिकारी रुपेश नार्वेकर, सत्यजित पारकर, जाई मुरकर, सुमेधा अंधारी आणि दीपिका जाधव यांची विशेष उपस्थिती होती. तसेच मुख्याधिकारी प्रतीक थोरात, प्रशासकीय अधिकारी अमोल अघम, सहायक कर निरीक्षक नेहा तळेकर, बांधकाम अभियंते प्रशांत राणे व सचिन नेरकर, लेखापाल महेश दळवी यांच्यासह सफाई कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

पेण प्रकल्प अधिकारी श्रीमती तेजस्विनी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग समितीतील नोडल अधिकारी विशाल घोरपडे व सदस्य सचिन शेलार यांच्यासह सर्वांच्या सामूहिक सहकार्यामुळे स्वच्छता मोहीम यशस्वीरीत्या पार पडली.

जनजातीय गौरव सेवा सप्ताह २०२६ अंतर्गत आयोजित हा स्वच्छता उपक्रम उत्साहपूर्ण व सकारात्मक वातावरणात संपन्न झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा