You are currently viewing कणकवली नगरपंचायतीतर्फे दिव्यांग स्वप्नील बागवेला ऍक्टिव्हा दुचाकी प्रदान

कणकवली नगरपंचायतीतर्फे दिव्यांग स्वप्नील बागवेला ऍक्टिव्हा दुचाकी प्रदान

कणकवली

कणकवली नगरपंचायतच्या उत्पन्नातील 5 % दिव्यांग कल्याण निधीतून कणकवली शहरातील दिव्यांग स्वप्नील काका बागवे याला नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते ऍक्टिव्हा दुचाकी प्रदान करण्यात आली. कणकवली नगरपंचायतच्या उत्पन्नातील 5 टक्के निधी हा दिव्यांगांसाठी कल्याण निधी म्हणून वापरला जातो. याच निधीतून दिव्यांग स्वप्नील याला ही दुचाकी प्रदान करण्यात आली. स्वप्नील हा कणकवली शहरात सकाळी दूध विक्री करतो. त्यानंतर दिवसभर कांदे-बटाटे तसेच भाजी विक्री करून आपला उदरनिर्वाह करतो. स्वप्नीलच्या या धडपडीला आता कणकवली नगरपंचायतने दिलेल्या दुचाकीमुळे वेग येणार आहे.

नगरपंचायतने दिलेल्या दुचाकीबद्दल स्वप्नीलने नगराध्यक्ष नलावडे व प्रशासनाचे आभार मानले. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, आरोग्य सभापती संजय कामतेकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, माजी नगरसेवक बंडू गांगण, बाळा सावंत, किशोर धुमाळे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा