You are currently viewing भाजप नगरसेविकेच्या पतीचा राडा;  कोविड सेंटरमध्ये घुसवली कार…

भाजप नगरसेविकेच्या पतीचा राडा; कोविड सेंटरमध्ये घुसवली कार…

 

नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयात आज एक वेगळीच घटना घडल्याचं पहायला मिळालं.  नाशिक महापालिकेच्या बिटको कोविड सेंटरमध्ये भाजप नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र ताजणे यांनी चांगलाच राडा केला आहे. राजेंद्र ताजणे यांनी रुग्णालयात मोठा गोंधळ घालत कोविड सेंटरच्या प्रवेशद्वारावरील काचाही फोडल्या.

 

 

राजेंद्र ताजणे यांनी रुग्णालयात दाखल होत असताना थेट रॅम्पवरून वाहन चढवले. कार आतमध्ये घुसवल्यावर पुढे असलेल्या ऑक्सिजन सिलिंडरला धडक देवून त्याचे नुकसान केले. कारमधून उतरून त्यांनी जोरदार शिवीगाळ केली. हातातील पेव्हर ब्लॉक स्टाफच्या दिशेने भिरकावला आणि धमकावले. नाशिक महापालिकेचे बिटको रुग्णालय हे सध्या कोरोना बाधित रुग्णांसाठी राखीव आहे या ठिकाणी सुमारे 900 रुग्ण उपचार घेत आहेत. या घटनेमुळे स्टाफ, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यात प्रचंड घबराट पसरली.

 

या प्रकारानंतर ताजणे यांनी त्यांची कार पुन्हा रुग्णालयाबाहेर आणली. राजेंद्र ताजणे यांच्यासोबत अजून तीन ते चार इसम देखील होते. या घटनेत रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले असून येथील कर्मचाऱ्यांत मोठी दहशत निर्माण झाली आहे. राजेंद्र ताजणे यांनी हा प्रकार नेमका कोणत्या कारणातून केला याचा उलगडा मात्र रात्री उशिरापर्यंत होऊ शकला नाही.

पालिकेचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. भाजप नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती असलेले राजेंद्र ताजणे हे याआधीही आपल्या वर्तनामुळे अनेकदा चर्चेत आले होते. त्यानंतर आज लोकप्रतिनिधीच्या पतीनेच कोविड सेंटरमध्ये गोंधळ घातल्याने शहरात या प्रकरणाची चर्चा होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × one =