You are currently viewing दत्ता सामंत यांचा माणगाव खोऱ्यातील आंबेरी गावात उबाठा गटाला धक्का ; सुमारे २०० कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

दत्ता सामंत यांचा माणगाव खोऱ्यातील आंबेरी गावात उबाठा गटाला धक्का ; सुमारे २०० कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

दत्ता सामंत यांचा माणगाव खोऱ्यातील आंबेरी गावात उबाठा गटाला धक्का ; सुमारे २०० कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उपस्थिती ; युवासेना शाखाप्रमुख सदगुरु घावनळकर, बूथ अध्यक्ष संदीप माडगूत यांच्यासह शेकडो कार्यकर्ते भाजपात ; हळदीचे नेरूर, नानेली, माणगाव येथील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचाही झाला भाजपा प्रवेश.

कुडाळ

भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी माणगाव खोऱ्यातील आंबेरी गावात उबाठा गटाला जोरदार धक्का दिला आहे. येथील शेकडो कार्यकर्त्यांनी दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत गोठोस येथील प्रचार सभेच्या वेळी भाजपात प्रवेश केला. यामध्ये युवासेना शाखाप्रमुख सदगुरु घावनळकर, बूथ अध्यक्ष संदीप म्हाडगुत, प्रकाश म्हाडगूत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तर हळदीचे नेरूर येथील कार्यकर्ते, नाणेली येथील महिला आणि माणगाव मधील संजय देवळी, महादेवाचे केरवडे येथील केरवडेकर भाऊ यांनीही नारायण राणे यांच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश केला आहे.

यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भविष्यात या माणगाव खोऱ्यातील सर्व प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही देत आपण जो प्रवेश केला आहात त्याचं स्वागत करत आपल्या सर्व मागण्या पूर्ण करू अशी ग्वाही दिली. प्रवेशकर्त्यांमध्ये युवा सेना शाखाप्रमुख सदगुरु घावनळकर, बूथ प्रमुख संदीप म्हाडगुत, जयसिंग तोरस्कर, प्रकाश माडगूत, चेतन माडगूत, दया राणे, यशवंत म्हाडगुत, गिरीश मेस्त्री, सुरेश तोरस्कर, नंदू मेस्त्री, चंद्रा तोरस्कर, नागेश कदम, रमेश म्हाडगूत,सदा म्हाडगुत, रामचंद्र म्हाडगुत, पांडू गोसावी, अरुण गोसावी, बाबू वरक, कांता गुडेकर, दिगंबर तातावडे, कृष्णा मेस्त्री, उल्हास मेस्त्री यांच्यासह शेकडो महिला प्रवेश केला

यावेळी व्यासपीठावर भाजपा नेते दत्ता सामंत, तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, बंड्या सावंत, संध्या तेरसे, दादा बेळणेकर, प्रकाश मोर्ये, सगुण धुरी, श्री. नवले, मनोहर साटम, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, तालुकाध्यक्ष आर के सावंत, संजना म्हाडगूत दिपाली सावंत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप सावंत यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा