You are currently viewing बालगृहातील बालकांसोबत दिवाळीचा सण अविस्मरणीय क्षण         

बालगृहातील बालकांसोबत दिवाळीचा सण अविस्मरणीय क्षण         

– प्रशिक्षणार्थी आय.एस.एस. करिष्मा नायर

सिंधुदुर्गनगरी

बालगृहातील काळजी व संरक्षण करत असणाऱ्या तसेच  विधी संघर्षग्रस्त बालकांसोबत दिवाळीचा सण साजरा करणे हा एक अविस्मरणीय क्षण आहे. अशा बालकांना कुटुंबाप्रमाणे दिवाळीचा सण साजरा करण्याचा मिळालेला आनंद कायमस्वरुपी मनामध्ये राहील, अशी भावनिक प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थी आय.एस.एस. करिष्मा नायर यांनी व्यक्त केली.

दिवाळीचा सण आनंदाचा, मांगल्याचा, हर्ष उल्हासाचा प्रत्येकजण आपल्या कुटुंबासोबत मोठ्या आनंदाने, प्रेमाने साजरा करतो. कोविड-१९ मुळे गेली दोन वर्ष हा सण साजरा करण्यास मर्यादा आल्या या कोविड- १९ मुळे काही बालकांनी आपले दोन्ही पालक किंवा एक पालक गमावले. अशा बालकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे राहिले. पालक गमावलेल्या व शासकीय मुलांच्या निरीक्षणगृह बालगृहात काही बालके दाखल झाली. अशा बालकांसोबत येथील शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृहात दिवाळी सण साजरा करण्यात आला. यावेळी प्र.निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड, बाल न्याय मंडळाच्या अध्यक्ष  ए.जे.बाचूलकर, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष एस.के. तायशेटे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ, अधिक्षक बी.जी. काटकर, दै. तरुण भारतचे आवृत्ती प्रमुख शेखर सामंत आदी  उपस्थित होते.

विधी संघर्षग्रस्त बालकांना दिवाळी सणाच्या शुभेच्छा देताना बाल न्याय मंडळाच्या अध्यक्ष  श्रीमती बाचूलकर म्हणाल्या, बालकांचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पण अशा कार्यक्रमामुळे आमचाही आनंद व्दिगुणीत झाला.

बालकल्याण समितीचे अध्यक्ष श्री. तायशेटे शुभेच्छा देताना म्हणाले, जन्माला आलो की आपण रडत येतो पण आयुष्यामध्ये कर्तुत्व एवढे मोठे करा की आपण जगाचा निरोप घेताना आपण हसलो पहिजे पण आपल्यासाठी सगळे रडले पाहिजेत, एवढे मोठे काम करा.

जिल्हा माहिला बाल विकास अधिकारी श्री. रसाळ म्हणाले, समाजातील शोषित, वंचित पिढीत महिला व बालकांसाठी शासन सर्वतोपरी काम करीत आहे. अनेक योजनांच्या माध्यमातून त्यांना सक्षम करण्यात येत आहे.

यावेळी प्र. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. फड, बालकल्याण समितीचे सदस्य ए.जी. पणदूरकर यांनीही आपल्या मनोगतपर शुभेच्छा दिल्या.

            प्रारंभी शासकीय तंत्रनिकेतनमार्फत भजनाचा कार्यक्रम सादर केला. मान्यवरांच्या हस्ते विधी संघर्षग्रस्त बालकांचे औक्षण करुन व भेटवस्तू, दिवाळीचा फराळ देण्यात आला.

            याप्रसंगी निरीक्षणगृहातील सर्व कर्मचाऱ्यानाही सत्मानित करण्यात आले. यावेळी बालन्याय मंडळाच्या सदस्या ॲङ नम्रता नेवगी, प्रा. अमर निर्मळे, प्रा. माया रहाटे, बाल न्याय मंडळाचे सदस्य के.के. कुबल, व्यवस्थापन समिती सदस्य जगदीश गवस, मिलींद बोर्डवेकर, शुभाष बांबुळकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा