You are currently viewing निगडीत काव्यानंद प्रतिष्ठानचा पुरस्कार वितरण व बहारदार कविसंमेलन सोहळा उत्साहात

निगडीत काव्यानंद प्रतिष्ठानचा पुरस्कार वितरण व बहारदार कविसंमेलन सोहळा उत्साहात

डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते विविध साहित्य पुरस्कारांचे वितरण; “आमच्या कविता” व “कथादर्पण” ग्रंथांचे प्रकाशन, महाराष्ट्रासह राज्याबाहेरील साहित्यिकांचा सहभाग

निगडी प्राधिकरण – शनिवार दिनांक १३ जून २०२६ रोजी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात काव्यानंद प्रतिष्ठान तर्फे विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले त्यावेळी उद्घाटक म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्री. सदानंद मोरे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व संत चित्रकार श्री. वि. ग. सातपुते उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक श्री. सूर्यकांत वैद्य आणि जळगाव येथील डॉ. श्रीकांत तारे उपस्थितीत होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन संपन्न झाले. सुभाष चव्हाण यांनी सभागृहात शंखनाद केला. गणेश वंदना अकलूज येथील कवयित्री कविता ढोबळे यांनी गायली. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक काव्यानंद चे संस्थापक अध्यक्ष सुनिल खंडेलवाल यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबई येथील लेखिका व कवयित्री वंदना ताम्हाणे यांनी केले.

सन २०२४ चा स्व. चिंतामणराव पोटे काव्यमित्र पुरस्कार पुणे येथील कवीवर्य श्री. हरिश्चंद्र कोठावदे यांच्या ऐलपैल या काव्यसंग्रहास देण्यात आला तर सन २०२५ चा स्व. चिंतामणराव पोटे काव्यमित्र पुरस्कार सिल्लोड जि. छत्रपती संभाजी नगर येथील शिक्षक कवीवर्य श्री राजू आठवले यांच्या प्रेमांकुर या कविता संग्रहास देण्यात आला.

सन २०२५ चा स्व. निर्मलादेवी खंडेलवाल काव्य सन्मान रत्नागिरी येथील कवयित्री डॉ. चित्रा गोस्वामी यांच्या कश्ती या काव्यसंग्रहास देण्यात आला.

काव्यानंद तर्फे घेण्यात आलेल्या कविता स्पर्धा २०२६ चे पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यात प्रथम पारितोषिक चाळीसगाव येथील कवयित्री सारिका चव्हाण यांना, द्वितीय पारितोषिक पुणे येथील कवयित्री हिमानी बागोरे यांना तर तृतीय पारितोषिक इंदौर येथील कवयित्री स्मिता सराफ यांना प्रदान करण्यात आला.

याच कार्यक्रमात महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील

साहित्यिकांच्या सहभागाने “आमच्या कविता” हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह आणि “कथादर्पण” हा प्रातिनिधिक कथासंग्रह प्रकाशित करण्यात आला.

सर्वच मान्यवरांनी आपल्या अनुभवसिद्ध वाणीतून उपस्थितांना यथोचित मार्गदर्शन केले. एकंदर सर्वांच्या भाषणातून एक सूर गवसला तो म्हणजे नवोदितांनी अभ्यास, मनन, चिंतन वाढवायला हवे. कविता दर्जेदार कशा होतील याकडे लक्ष द्यायला हवे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात मानवी मूल्यांचा कस लागणार हे अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात बहारदार कविसंमेलन संपन्न झाले. त्यात वाणी ताकवणे पुणे, ऐश्वर्या डगांवकर पुणे, संगीता करवंदे पुणे, अरुणा होणगेकर मुंबई, रामचंद्र किल्लेदार ग्वालियर, स्मिता सराफ इंदूर, वंदना ताम्हाणे मुंबई, कविता ढोबळे अकलूज, तृप्ती मुदगल पुणे, हिमानी बागोरे पुणे, डॉ चित्रा गोस्वामी रत्नागिरी, संजीवनी बारगळ इंदूर, सुभाष धाराशिवकर पुणे, राजू आठवले सिल्लोड, विवेक पोटे पुणे, नीलिमा फाटक पुणे, शीतल मोहोळकर मुंबई, हरिश्चंद्र कोठावदे पुणे, सविता कुंजीर पुणे, वि ग सातपुते, डॉ श्रीकांत तारे, सूर्यकांत वैद्य, डॉ सदानंद मोरे आणि सुनिल खंडेलवाल याकवी कवयित्रींनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सांगता पसायदान गायनाने झाली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा.सुभाष चव्हाण, विवेक पोटे, प्रमोद कबनुरकर, अमोल शेळके, वंश खंडेलवाल यांचे विशेष सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा