तेरेखोल नदीला पूर ; बांदा बाजारपेठेत पुराचं पाणी घुसलं

तेरेखोल नदीला पूर ; बांदा बाजारपेठेत पुराचं पाणी घुसलं

बांदा :

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने बांद्यातील तेरेखोल नदीला पूूूर आला. पुराचे पाणी बाजारपेठेत घुसले आहे. बांदा शहरातील आळवाडी-निमजगा रस्ता पाण्याखाली गेला आहे. काही दुकानात पाणी गेल्याने दुकानातील सामान सुरक्षितस्थळी हलविले आहे. वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे पूल पाण्याखाली गेल्याने वेंगुर्ले मार्गे बेळगाव मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनाने बांदा शहर हे पूर प्रवण असल्याने सावंतवाडी तालुक्यासाठी जोखमीच्यावेळी एनडीआरएफचे पथक तैनात केले आहे. या पथकाने मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी शहरातील तेरेखोल नदी व पूर प्रवण क्षेत्राची पाहणी केली होती. आज पहाटेच पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरले. दुपारपर्यंत याठिकाणी पूरस्थिती होती, मात्र प्रशासनाचे एनडीआरएफचे पथक याठिकाणी फिरकलेच नाही.

कणकवली, देवगड, वैभववाडी, सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्या इशारा पातळीच्या बाहेर वाहत असल्याने बांदा परिसरातील काही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा