You are currently viewing फोंडाघाटात भटके कुत्रे व मोकाट जनावरांचा सुळसुळाट; रात्री वाहनचालकांसमोर जीवघेणे आव्हान

फोंडाघाटात भटके कुत्रे व मोकाट जनावरांचा सुळसुळाट; रात्री वाहनचालकांसमोर जीवघेणे आव्हान

फोंडाघाटात भटके कुत्रे व मोकाट जनावरांचा सुळसुळाट; रात्री वाहनचालकांसमोर जीवघेणे आव्हान

कंटेनर व लक्झरी बसांची मोठी वाहतूक; ग्रामपंचायत, पोलीस व आरटीओने तातडीने उपाययोजना करावी – अजित नाडकर्णी

फोंडाघाट :

फोंडाघाट परिसरात भटके कुत्रे आणि मोकाट जनावरांचा वाढता सुळसुळाट वाहनचालकांसाठी गंभीर समस्या ठरत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावर मोठ्या संख्येने जनावरे व कुत्रे वावरत असल्याने वाहन चालविणे तारेवरची कसरत बनली असून मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

फोंडाघाट हा घाटमार्ग रात्री तुलनेने सुरक्षित असल्यामुळे या मार्गावरून कंटेनर, लक्झरी बस तसेच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र, रस्त्यावर अचानक येणारी भटकी जनावरे आणि कुत्रे यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने मोकाट जनावरांचा व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, तसेच पोलीस यंत्रणा आणि प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांनीही या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी या गंभीर प्रश्नाकडे राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री यांचे लक्ष वेधून तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा